शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फारकतनाम्यावर सही कर; अन्यथा पॉलिसी बंद! घटस्फोटासाठी पतीचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2022 14:15 IST

१२ नोव्हेंबर रोजी रात्री १ च्या सुमारास पोलीस दप्तरी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

अमरावती : फारकतनाम्यावर सही करत नसल्याने विमा पॉलिसी बंद करण्याची धमकी देत एका विवाहितेचा अनन्वित छळ करण्यात आला. तो जाच असह्य झाल्याने अखेर तिने माहेर व पुढे पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी तिचा पती उज्वल रमेशचंद्र अग्रवाल (४०, रा. मिश्रालाईन, परतवाडा) व अन्य एकाविरूद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. १२ नोव्हेंबर रोजी रात्री १ च्या सुमारास पोलीस दप्तरी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

तक्रारीनुसार, तक्रारकर्त्या महिलेचे सन २०१३ मध्ये उज्वल अग्रवाल याच्यासोबत लग्न झाले होते. त्या दाम्पत्याला आठ वर्षे वयाची मुलगी देखील आहे. प्रॉपर्टी ब्रोकर असलेला पती उज्वल याने बऱ्याच वर्षांपासून आपला छळ चालविला. मात्र, मुलीकडे, कुटुंबाकडे पाहत तो त्रास ती सहन करत राहिली. अलिकडे त्याला दारूचे व्यसन लागले. नेहमीच दारू घेऊन घरी आला की, तो शेत खरेदीसाठी माहेरहून ३ लाख रुपये आण अशी मागणी करायचा. त्याला नकार दिला की तो आपल्याला शिवीगाळ करायचा. पती उज्वल अग्रवाल आपल्या चारित्र्यावर संशय घेतात तर, सासु ही घरगुती कामावरुन शिवीगाळ करत असल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.

अशी घडली घटना ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास पती उज्वल आपल्याकडे आला. तू फारकतनाम्यावर सही करत नाही, म्हणून मला तुझ्या नावावर असलेली एलआयसी पॉलिसी बंद करायची आहे, असे त्याने सुनावले. त्यावर आपण सही करणार नाही, असे ठामपणे बजावल्याने त्याने चिडून शिवीगाळ केली. त्यामुळे आपण मुलीला घेऊन चांदूररेल्वे येथील माहेर गाठले. असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. ११ ला रात्रीच तिने माहेरच्या आप्तांसह परतवाडा पोलीस ठाणे गाठून पती व अन्य एकाविरूद्ध तक्रार दाखल केली.

टॅग्स :Divorceघटस्फोटCrime Newsगुन्हेगारी