शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sidhu Musewala Murder: सिद्धू मुसेवालाची हत्या का आणि कुणी केली? समोर आलं कॅनडा कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 23:47 IST

पोलिसांना संशय आहे, की विक्की मुद्दुखेडा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा होता आणि त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने आपल्या गुंडांच्या करवी सिद्धू मुसेवालाची हत्या केलेली असू शकते.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसंदर्भात मानसाचे एसएसपी (SSP) गौरव तुरा यांनी मोठा खुलासा केला आहे. कॅनडातील गँगस्टर गोल्डी बरारने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे तुरा यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर 3 गाड्यांनी मुसेवालाची थार थांबवली होती, असेही SSP तुरा यांनी म्हटले आहे.

मुसेवालाने आज बुलेटप्रुफ गाडी नेली नाही. त्यांच्यासोबत अंगरक्षकही नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर 9 एमएम पिस्तुलाने गोळीबार करण्यात आला आहे. यावेळी सिद्धू मुसेवाला स्वतः ड्रायव्हिंग करत होता. तसेच, लॉरेन्स बिश्नोई आणि लकी पटियाल यांच्यातील गँगवॉरमुळे मूसवालाची हत्या झाली. लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी गोल्डी बरारने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

म्हणून पोलिसांना वाटते गँगची शक्यता - 2021 मध्ये विकी मिददुखेडाची हत्या झाली होती. या हत्येमध्ये सहभागी असलेल्या तीन गुन्हेगारांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतेच पकडले होते. शार्प शूटर सज्जन सिंग उर्फ ​​भोलू, अनिल कुमार उर्फ ​​लठ आणि अजय कुमार उर्फ ​​सनी कौशल, अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. यानंतर, पंजाब पोलिसांनी यांना तिहार कारागृहातून रिमांडवर घेतले होते.

या तिन्ही हल्लेखोरांनी चौकशीदरम्यान एका प्रसिद्ध गायकाच्या मॅनेजरच्या हत्याकांडात सहभागी असल्याचे म्हटले होते.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पंजाबी  गायक सिद्धू मुसेवालाच होता. पोलिसांना संशय आहे, की विक्की मुद्दुखेडा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा होता आणि त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने आपल्या गुंडांच्या करवी सिद्धू मुसेवालाची हत्या केलेली असू शकते. कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी हा लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा ऑपेट करतो.

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबार