शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सिद्राममळा येथील खुनाचा उलगडा, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 01:17 IST

सिद्राममळा परिसरात नवा व जुना मुठा कालव्याच्यामधील मोकळ्या जागेत डोक्यात दगड घालून खून केलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या खुनाचे गूढ उकलण्यास गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.

लोणी काळभोर  - येथील तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील सिद्राममळा परिसरात नवा व जुना मुठा कालव्याच्यामधील मोकळ्या जागेत डोक्यात दगड घालून खून केलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या खुनाचे गूढ उकलण्यास गुन्हे शोध पथकाला यश आले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.सचिन सुुुभाष कदम (वय ३४, रा. जयहिंंदनगर, जुनी महाराष्ट्र बँकेमागे, कदमवाकवस्ती, ता. हवेली) आणि रोहन ऊर्फ भैया अनिल चव्हाण (वय २५, पाषाणकरबाग, पिठाच्या गिरणीमागे, लोणी काळभोर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेल्या अभिजित वाल्मीक काळभोर (वय २६, रा. समतानगर, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) याचा मृतदेह २ नोव्हेंबरला दुपारी ३.४५ च्या सुमारास तीर्थक्षेत्र रामदराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सिद्राममळा परिसरातील नवा व जुना मुठा कालव्याच्यामधील पाटबंंधारे विभागाच्या मोकळ्या जागेत आढळला होता.याप्रकरणी अभिजितचा भाऊ मेघराज वाल्मीक काळभोर याने फिर्याद दिली होती. पुणे, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवान, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार समीर चमनशेख, सचिन मोरे, सागर कडू, परशुराम सांगळे यांनी गुन्ह्याचा सखोल अभ्यास केला. खून कदम व चव्हाण यांनी केला, याची खात्री पटल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. अभिजित काळभोर त्याला दारू पिऊन वारंवार त्रास देऊन दहशतीखाली ठेवून त्याने काम करून आणलेली रक्कम तो धाक दाखवून काढून घेत होता. तसेच त्यास शिवीगाळ करून वारंवार अपमानास्पद वागणूक देत होता. कदम राहत असलेल्या परिसरात त्याच्या भावाची लहान मुुलगी घराच्यासमोर खेळत असताना मृत अभिजित याने तिच्या अंगावर गाडी घातल्याचा राग कदम याच्या मनात होता. यातूनच त्यांनी खून केला. 

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी