शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Shweta Ranawade: श्वेता रानवडे हत्या प्रकरणात हलगर्जी; चतुशृंगी पोलिस अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 23:36 IST

गंभीर स्वरूपाचे आरोप असलेला तक्रार अर्ज आल्यानंतरही चतु:शृंगी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही. दीड महिना आधीच आपल्यावरचे संकट श्वेताने ओळखले होते.

- किरण शिंदे पुणे : पुणे शहर 9 नोव्हेंबर रोजी एका भीषण हत्याकांडाने हादरले. लग्नाला नकार दिल्याने उच्च शिक्षित श्वेता रानवडे (वय 22) या तरुणीचा भरदिवसा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केला गेला. खून करून पळालेल्या प्रियकर प्रतीक ढमालेने जंगलात जाऊन गळफास घेत आयुष्य संपवले. श्वेताने घटनेच्या काही दिवस आधीच चतु:शृंगी पोलिसांकडे प्रतीकची तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी या तक्रारीची दखलच घेतली नाही. चतुशृंगी पोलिसांच्या हलगर्जीपणावर आता कारवाई झाली आहे. 

पीएसआय वैशाली सूळ यांना निलंबित करण्यात आले आहे. तर वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पीएसआय शामल पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. प्रतीक आणि श्वेता दोघेही नातेवाईक होते. दोघांचेही 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांचे लग्नही ठरले होते. मात्र अलीकडे प्रतीकची वर्तणूक खटकत असल्याने श्वेताने त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकत लग्नास नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या प्रतिकने श्वेताच्या पोटात चाकूने वार करून तिचा खून केला. या संपूर्ण प्रकरणात चतुशृंगी पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला होता. 

पोलिसांना लिहिलेल्या तक्रार अर्जात श्वेताने गंभीर आरोप केले होते. बोलणे बंद केल्यामुळे प्रतिकने श्वेताला खोटे बोलून भेटायला बोलावले आणि गाडीत जबरदस्तीने बसायला भाग पाडून दूर घेऊन गेला. श्वेता त्याच्यासमोर रडत होती, हात जोडत होती मात्र तो ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर श्वेताला प्रत्येकवेळी धमक्या दिल्या जात होत्या, नाही ऐकलं तर घरात घुसून तमाशा करू अशा धमक्या दिल्या गेल्या..त्याचा स्वभाव पटत नसल्यामुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा परिणाम भोगायला तयार रहा म्हणून त्याने धमकी देखील दिली होती. एकत्र असताना काढलेल्या फोटो, व्हिडीओचा तो गैरवापर करू शकतो. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार तिने दिलेली होती. 22 सप्टेंबर रोजी श्वेताने पोलिसांना हा तक्रार अर्ज दिला होता. 

गंभीर स्वरूपाचे आरोप असलेला तक्रार अर्ज आल्यानंतरही चतु:शृंगी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही. दीड महिना आधीच आपल्यावरचे संकट श्वेताने ओळखले होते. त्याची कल्पनाही तिने पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी श्वेताच्या तक्रार अर्जावर कोणतीही कारवाई न केल्याने प्रतीकचे मनोधैर्य वाढले व 9 नोव्हेंबर रोजी त्याने श्वेताचा निर्घृण खून केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी