शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात ४० लाखांच्या जुन्या नोटा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 21:26 IST

४० लाखांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.  

ठळक मुद्देजुन्या नोटा घेऊन जाणाऱ्या एका आरोपीस सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी अटक केली़पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : चलनातून बाद झालेल्या ५०० व १ हजार रुपयांच्या सुमारे ४० लाख रुपयांच्या जुन्या नोटा घेऊन जाणाऱ्या एका आरोपीस सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनीअटक केली़ त्याच्याकडून या ४० लाखांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.  श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं.७, सरस्वती कॉलनीत देवकर वस्तीजवळ पोलिसांनी सापळा लावून आरोपी महेश मारुती डेंगळे (वय ३५, रा. सरस्वती कॉलनी) याला ताब्यात घेतले त्याच्याकडून चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या १ हजार ९७६ नोटा त्याची एकूण किंमत ९ लाख ८८ हजार रुपये व १००० रुपयाच्या २ हजार ९२४ नोटा त्याची एकूण किंमत २९ लाख २४ हजार रुपये जप्त करण्यात आले़ या नोटा एका पिशवीमधून घेऊन जात असताना अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतल्या़ पोलीस कॉन्स्टेबल शहाबाज सुलतान पटेल, शहर पोलीस ठाण्याचे नरवडे व तालुका पोलीस ठाण्याचे लोडे आदींचा या गस्ती पथकात समावेश आहे.जप्त करण्यात आलेल्या नोटा आरोपीने कोठून व कोणाकडून आणल्या व कोठे घेऊन जात होता, याचा खुलासा सोमवारी रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. शहाबाज सुलतान पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी डेंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Note BanनोटाबंदीPoliceपोलिसArrestअटकAhmednagarअहमदनगर