शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

Shraddha Walker Murder Case : "श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताब 12 महिलांच्या संपर्कात होता, काहीजणी आलेल्या फ्लॅटवर"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:47 IST

Shraddha Walker Murder Case : आफताबने ज्या महिलेला श्रद्धाची अंगठी दिली होती, त्या महिलेचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे

आफताब पूनावालाने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. आज त्याची नार्को टेस्ट करण्यात आली. आफताबबाबत आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. मे महिन्यात श्रद्धाच्या हत्येनंतर तो 12 महिलांच्या संपर्कात होता. यातील काहीजणी त्याच्या फ्लॅटवरही आल्या होत्या. पोलिसांनी आतापर्यंत अशा 12 महिलांचे जबाब नोंदवले आहेत.

आफताबने ज्या महिलेला श्रद्धाची अंगठी दिली होती, त्या महिलेचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. मानसशास्त्रज्ञ असलेल्या महिलेशी आफताबची ओळख डेटिंग एपच्या माध्यमातून झाली होती. मे महिन्याच्या अखेरीस दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. या महिलेने ऑक्टोबरमध्ये दोनदा छतरपूर येथील घराला भेट दिली होती जिथे श्रद्धाची हत्या करण्यात आली होती. त्य़ावेळी नेमकं काय घडायचं हे महिलेने सांगितलं आहे. 

"आम्हाला आफताबचे 70 तुकडे करायचे आहेत कारण त्याने आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले"

पोलिसांना दिलेल्या माहितीत महिलेने सांगितले आहे की, जेव्हा ती आफताबला त्याच्या फ्लॅटमध्ये भेटली तेव्हा तो पूर्णपणे नॉर्मल आणि आनंदी दिसत होता. तिने सांगितले की, जेव्हा श्रद्धाची हत्या उघडकीस आली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. ज्या घरामध्ये ती आफताबला भेटायला गेली होती त्याच घराच्या फ्रीजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे लपवून ठेवले होते.

तिहार जेलमध्ये 'अशी' गेली आफताबची पहिली रात्र; आरामात झोपला, चेहऱ्यावर नव्हतं टेन्शन अन्...

तिहार जेलमध्ये आफताब आत्महत्या करू शकतो?, अधिकाऱ्यांना वेगळीच भीती; श्रद्धाबद्दल विचारलं की...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सांगितले की आफताबच्या फ्लॅटमध्ये अनेक परफ्यूम आणि डीओ आहेत. त्याने तिला त्याची एक बाटलीही भेट दिली होती. तो सतत सिगारेट ओढत होता पण त्याच बरोबर मला सिगारेट सोडायची आहे असेही सांगत होता. तसेच आफताबने तिला सप्टेंबरमध्ये मुंबईला जाणार असल्याचे सांगितले होते आणि अनेकदा मुंबईत आपले घर असल्याचेही बोलला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर