शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'Yes I killed her' श्रद्धाचे तुकडे करणाऱ्या आफताबची कबुली; चौकशीत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 20:43 IST

हत्येच्या दिवशी काय घडलं या प्रश्नाच्या तपासात पोलिसांना थरकाप उडवणारी माहिती हाती लागली

नवी दिल्ली - श्रद्धा वालकर हत्याकांडात आरोपी आफताबनं हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरुवात केली आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले? हे जाणून घेण्यासाठी पोलीस त्या जंगलात जाणार आहे. आफताबनं श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली असं पोलिसांनी म्हटलं. पोलिसांनी श्रद्धा आणि आफताब यांच्या कॉमन फ्रेंडचीही चौकशी सुरू केलीय. 

पोलिसांच्या माहितीनुसार, आफताब केवळ इंग्रजीत बोलत आहे. Yes i killed Her सांगत आफताबनं श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली. परंतु आतापर्यंतच्या चौकशीत आणि तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. १८ मे रोजी आफताबनं गळा दाबून श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर पुढील ३ महिने हळूहळू तो मृतदेहाचे तुकडे फेकत होता. श्रद्धाच्या हत्येनंतर २ महिन्यांनी आफताब पुन्हा डेटिंग एपच्या माध्यमातून सक्रीय झाला होता. त्याने एका मुलीशी मैत्री केली होती. जून आणि जुलैमध्ये त्याच्या घरात श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे पडले असताना त्याने नव्या गर्लफ्रेंडला घरी बोलावलं होतं.

हत्येच्या दिवशी काय घडलं? हत्येच्या दिवशी काय घडलं या प्रश्नाच्या तपासात पोलिसांना थरकाप उडवणारी माहिती हाती लागली. १८ मे रोजी श्रद्धा आणि आफताब यांच्या लग्नावरून भांडण झाले. या भांडणात आफताब श्रद्धाच्या छातीवर बसून तिचा गळा दाबू लागला. हत्या केल्यानंतर सर्वात आधी त्याने मृतदेह बाथरूममध्ये ठेवला. त्यानंतर इंटरनेटवरून मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी सर्च करू लागला. दुसऱ्यादिवशी त्याने इलेक्ट्रिक चाकू खरेदी केला त्याने मृतदेहाचे तुकडे केले. श्रद्धा आणि त्याचे रक्ताचे कपडे कचरा उचलणाऱ्या गाडीत फेकले. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कबर्ड, किचन आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर इंटरनेटवर पुरावे मिटवण्याचा शोध घेऊ लागला. 

बाजारात हायपोक्लोरिक एसिड खरेदी केले आणि घरातील लादी साफ केली जेणेकरून फॉरेन्सिक तपासात पुरावे मिळू नये. आफताबनं शेफचं ट्रेनिंग घेतले. हत्येच्या २ दिवस तो मृतदेहाचे तुकडे करत होता. पुढील ३ महिने त्याला एक एक तुकडे जंगलात फेकला. त्याचसोबत श्रद्धाचे सोशल मीडिया अकाऊंट एक्टिव्ह ठेवले जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये. आफताबनं श्रद्धाच्या नावानं मित्रांशी चॅटिंग केले होते. ६ महिने तो पोलिसांना चकमा देत होता. परंतु ज्यादिवशी पोलिसांनी त्याचं दार ठोठावले तेव्हा त्याचे सर्व प्लॅनिंग उघड झाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"