शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा हत्याकांड: दिल्ली पोलिसांना मोठे यश; जंगलातून कवटी, जबड्याचा भाग सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 21:06 IST

रविवारी पहाटे दिल्ली पोलिसांचे पथक आरोपी प्रियकर आफताब याला छतरपूर पहारी भागात त्याच्या घरी घेऊन गेले होते. पथक निघेपर्यंत निमलष्करी दल आणि दिल्ली पोलिसांचे जवान तैनात करण्यात आले होते.

श्रद्धा वालकर हत्याकांडात दिल्ली पोलिसांना आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. रविवारी २०० पोलिसांना घेऊन दिल्ली पोलिसांनी महरौलीचे जंगल पिंजून काढले. यामध्ये पोलिसांना मानवी कवटी आणि जबड्याचा काही भाग सापडला आहे. याचबरोबर शरीराची काही हाडे देखील सापडली आहेत.  पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे तुकडे २७ वर्षीय श्रद्धाचे असू शकतात. फॉरेन्सिक लॅबमध्ये याची तपासणी होऊ शकते, यानंतर ठोस काही सांगता येणार आहे. 

 मोठी अपडेट! आफताबने श्रद्धाचे शीर फेकलेले ठिकाण सापडले; दिल्ली पोलीस तलावाचे पाणी उपसताहेत...रविवारी दिल्ली पोलिसांचे पथक आरोपी प्रियकर आफताब याला छतरपूर पहारी भागात त्याच्या घरी घेऊन गेले होते. याच घरात त्याने श्रद्धाचा खून केला होता. रविवारी पहाटे आफताबच्या घरी तपासासाठी पोहोचलेले पोलिस आणि एफएसएलचे पथक तासाभराच्या तपासानंतर दुपारी दोनच्या सुमारास बाहेर पडले. यावेळी पोलिस पथकाने घरातील अनेक वस्तू गाडीत ठेवून सोबत नेल्या. घरात गेल्यापासून ते पथक निघेपर्यंत निमलष्करी दल आणि दिल्ली पोलिसांचे जवान तैनात करण्यात आले होते. दुसरीकडे सुमारे 200 पोलिसांचे पथक शोध मोहिमेसाठी मेहरौलीच्या जंगलात गेले होते. पोलिसांच्या पथकाने जंगलातून काही अवशेष आणि चिरलेली हाडे जप्त केली आहेत. 

आफताबने श्रद्धाचे शीर एका तलावात फेकल्याची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलीस आणि महापालिकेची टीम आज दिवसभर एक मोठे तलाव रिकामे करण्याच्या कामी लागली आहे. छतरपुर एनक्लेव येथील या तलावात आफताबने श्रद्धाचे शीर फेकले होते. आता ते शोधण्यासाठी पोलीस हे तलाव उपसत आहेत. 

दिल्ली पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारचे १७ हाडांचे तुकडे सापडले आहेत. ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. हाडांचे तुकडे पाहून फॉरेन्सिक एक्स्पर्टचे म्हणणे आहे की ते मानवाचेच आहेत. ती हाडे श्रद्धाचीच आहेत हे सिद्ध करणे आता एक मोठे आव्हान बनले आहे. त्यासाठी डीएनए टेस्टिंगही केली जात आहे. या हाडांमध्ये जांघेतील हाड देखील आहे. या हाड़ांवर धारधार हत्याराने कापल्याचेही दिसत आहे. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिस