शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Murder Case: आफताबच्या स्वयंपाकघरात सापडले रक्ताचे डाग...पोलिस श्रद्धाचे शिर, हत्यार, मोबाइल शोधण्याच्या प्रयत्नात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 06:55 IST

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना अद्याप तीन प्रमुख पुरावे सापडण्याची प्रतीक्षा आहे. श्रद्धाची हत्या केली ते शस्त्र, तिचे शिर आणि मोबाईल हे ते तीन पुरावे.

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना अद्याप तीन प्रमुख पुरावे सापडण्याची प्रतीक्षा आहे. श्रद्धाची हत्या केली ते शस्त्र, तिचे शिर आणि मोबाईल हे ते तीन पुरावे. दरम्यान, आफताबच्या स्वयंपाकघरातून पोलिसांना रक्ताचे डाग सापडले आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने तिला ठार मारले त्याच्या १० दिवसांपूर्वीच तिला मारले असते. परंतु, भांडणानंतर श्रद्धा भावुक झाली. त्यामुळेच त्याने खून करण्याचा बेत रद्द केला. श्रद्धाने त्याला फोनवर एका मुलीशी बोलताना ऐकले होते, त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले होते, असे समोर आले आहे.

वडिलांना दिल्लीला बोलावण्याची शक्यताश्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबच्या स्वयंपाकघरातून पोलिसांना रक्ताचे डाग सापडले आहेत. पोलिसांनी सोमवारी रात्री आफताबला त्याच्या फ्लॅटमध्ये क्राइम सीन रिक्रिएशनसाठी नेले होते. दरम्यान, त्याच्या स्वयंपाकघरात रक्ताचे डाग आढळले. रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. पोलिस श्रद्धाच्या वडिलांना डीएनए ताडून पाहण्यासाठी दिल्लीला बोलावू शकतात. साकेत न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर आता दिल्ली पोलिस आफताबची नार्को टेस्ट करू शकतात.फोटोला ‘हॅपी डेज’ कॅप्शनश्रद्धा वालकर इन्स्टाग्रामवर फारशी सक्रिय नव्हती. तिच्या हत्येच्या एक आठवडा आधी, तिने हिमाचल प्रदेशमध्ये स्वतःचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र पोस्ट केले होते. १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी तिने आफताबसोबत एक फोटो पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले ‘’हॅपी डेज’’. आफताबसोबत तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा एकमेव फोटो होता.

अशी केली हुशारी?nश्रद्धा वालकर खून प्रकरणात तिने एक मोठी घोडचूक केल्याचे उघडकीस आले आहे. श्रद्धा आणि आफताब वसईत राहत असताना त्यांच्यात वाद सुरू झाला होता.n मदतीसाठी तिने तिचा शालेय मित्र लक्ष्मण नाडर याच्याकडे धाव घेतली होती. तेव्हा नाडरने आफताबला पोलिसांत जाण्याची धमकी दिली होती. परंतु, नंतर श्रद्धानेच त्याला तसे करण्यापासून रोखले होते. nनाडरने फोन केला.  त्याने श्रद्धा घर सोडून निघून गेल्याचा कांगावा केला. nनाडरला शंका आल्याने त्याने पोलिसांत तक्रार देऊ, असे सांगितले. त्यावर श्रद्धा राग शांत झाल्यावर घरी येईल, ती येताच तुला कळवतो, असे म्हणत त्याने नाडरला पोलिसांत जाण्यापासून रोखले होते. यानंतर आफताबने कधीही संपर्क केला नाही, अशी माहिती नाडरने दिली. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी