शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

Shraddha Murder Case: आफताबचा गुन्हा कळल्याने कुटुंबाने गाठली मुंबई? १५ दिवसांपूर्वी आला हाेता घरी, श्रद्धाही आधी येऊन गेल्याचा शेजाऱ्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 08:53 IST

Shraddha Murder Case: आरोपी आफताबचे वडील अमीन पुनावाला आणि आई  वसई येथील युनिक पार्क सोसायटीमध्ये राहत होते. मात्र, पंधरा दिवसांपूर्वीच आफताबचे त्यांनी घर रिकामे करून मुंबईत शिफ्ट होतो, असे सांगून निघून गेल्याची माहिती या सोसायटीच्या आदिल खान या पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

नालासोपारा : आरोपी आफताबचे वडील अमीन पुनावाला आणि आई  वसई येथील युनिक पार्क सोसायटीमध्ये राहत होते. मात्र, पंधरा दिवसांपूर्वीच आफताबचे त्यांनी घर रिकामे करून मुंबईत शिफ्ट होतो, असे सांगून निघून गेल्याची माहिती या सोसायटीच्या आदिल खान या पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, आपल्या मुलाने मोठा गुन्हा केल्याचे कळल्यानंतर आपले राहण्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय आफताबच्या पालकांनी घेतला नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.१५ दिवसांपूर्वी जेव्हा वसईतले घर रिकामे केले, त्यानंतर काही वस्तू घरात राहिल्या होत्या. त्या नेण्यासाठी दोन दिवसांनी वसईतील घरी आफताब येऊन गेल्याची खळबळजनक माहिती सोसायटीचे पदाधिकारी आदिल खान यांनी दिली. 

खान यांनी सांगितले की,  आफताब अधूनमधून घरी यायचा. मात्र, एक महिन्यापूर्वी पोलिस आफताबच्या आई-वडिलांकडे चौकशीसाठी आले होते. त्यानंतर आम्ही विचारणा केली असता अमीन पुनावाला यांनी सांगितले की, मुलगा दिल्लीला शिफ्ट झाला आहे आणि मुलीच्या पालकांनी तक्रार केल्याने पोलिस व्हेरिफिकेशनसाठी आले होता. अधूनमधून आफताब आई-वडिलांना भेटायला घरी येत असे. त्यावेळी त्याच्यासोबत हत्या झालेल्या मुलीला पाहिले असल्याचे खान म्हणाले.

घर रिकामे करताना विचारले असता, त्यांनी उत्तर दिले की, आफताबच्या लहान भावाला मुंबईत नोकरी लागली असून, येण्या - जाण्याचा त्रास वाचण्यासाठी मुंबईत जात आहोत.

दोन स्टेटमेंटमध्ये तफावत    आफताब आणि त्याच्या आईला माणिकपूर पोलिसांनी श्रद्धाच्या गायबप्रकरणी पोलिस ठाण्यात ३ नोव्हेंबरला बोलावले होते.     आरोपी आफताब याचे ३ नोव्हेंबर आणि त्याआधी दोन वेळा स्टेटमेंट घेतले. पण दोन्ही स्टेटमेंटमध्ये तफावत आढळल्याने माणिकपूर पोलिसांना संशय आल्याने ७ नोव्हेंबरला दिल्लीला गेले होते. 

मुलीने आपले ऐकले असते, तर जिवंत असती, श्रद्धा वालकरच्या वडिलांची खंतलोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसईच्या श्रद्धा वालकर हत्याकांडात आता धक्कादायक माहिती उघड होऊ लागली आहे. आपल्या २६ वर्षीय मुलीची तिच्या लिव्ह-इन पार्टनरने अत्यंत निर्दयीपणे हत्या करून तिचे ३५ तुकडे केले, ही अंगावर शहारे आणणारी घटना आहे. प्रेमात पडलेल्या आपल्या मुलीने आपले ऐकले असते, तर कदाचित आज ती जिवंत असती, अशी खंत तिचे वडील विकास मदन वालकर यांनी व्यक्त केली आहे. श्रद्धाचे वडील विकास यांनी म्हटले आहे की, मी मुलीला खूप समजावले; पण तिने ऐकले नाही. स्वतःचे निर्णय स्वतःच घेईन, असा हट्ट तिने केला होता. श्रद्धा व आफताबच्या रिलेशनशिपची माहिती कुटुंबाला १८ महिन्यांनंतर समजली. श्रद्धाने २०१९ मध्ये आपल्या आईला ती आफताबसोबत लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचे सांगितले होते. त्याला मी व माझ्या पत्नीने विरोध दर्शवला होता. त्यामुळे श्रद्धा नाराज झाली होती, तसेच मी आता २५ वर्षांची झाली आहे.  मला माझे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला आफताबसोबत राहायचे आहे. मी आजपासून तुमची मुलगी नाही, असे तिने सांगितले होते. यानंतर ती घर सोडून जाऊ लागली तेव्हा माझ्या पत्नीने तिची खूप समजूत काढली; पण तिने ऐकले नाही. आफताबसोबत निघून गेली. आम्हाला त्यांच्या मित्रांकडून त्यांची माहिती मिळत होती. काही दिवसांनंतर तिच्या आईचे निधन झाले. त्यानंतर श्रद्धाने एक-दोन वेळा माझ्याशी चर्चा केली. तेव्हा तिचा आफताबशी वाद सुरू असल्याचे समजले. त्यावेळी एकदा ती घरीही आली. तेव्हा आफताब आपल्याला मारहाण करत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर मी तिला घरी परतण्याचे सांगितले; पण आफताबने समजूत काढल्यानंतर पुन्हा ती त्याच्यासोबत गेली.श्रद्धाचा फोन २ महिन्यांपासून बंदश्रद्धा गेल्यानंतर मला तिची मैत्रीण शिवानी म्हात्रे व लक्ष्मण नाडर यांनी सांगितले की, श्रद्धा व आफताबमधील संबंध बिघडले आहेत. आफताब तिला मारहाण करतो.मी तिला अनेकदा समजावले; पण तिने ऐकले नाही. त्यामुळे मी तिच्याशी बोलणे सोडले. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी लक्ष्मणने माझा मुलगा श्रीजयला फोन करून श्रद्धाचा फोन दोन महिन्यांपासून बंद असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी मुलाने मला ही गोष्ट सांगितली. तेव्हा मी लक्ष्मणशी चर्चा केल्यानंतर माणिकपूर ठाण्यात श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईVasai Virarवसई विरार