शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आपट्यात दुकानांचे गाळे व मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 00:33 IST

आपटा गावातील दुकानांचे गाळे व दत्त मंदिरातील दानपेटी फोडून एकूण २८,४०० रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाल्याची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मोहोपाडा - आपटा गावातील दुकानांचे गाळे व दत्त मंदिरातील दानपेटी फोडून एकूण २८,४०० रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाल्याची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.मौजे आपटा गावातील एकविरा, माउली इलेक्ट्रीक ॲण्ड हार्डवेअर शेजारील असलेल्या गाळाधारकांचे शटर लोखंडी वस्तूने वाकवून, तसेच गावातील श्रीदत्त मंदिरातील दरवाज्याचा कोयंडा तोडून दानपेटी फोडल्याची फिर्याद अशोक गणपत काठे (वय २०) यांनी दिली आहे. यात चोरट्यांनी आपटा दत्त मंदिरातील स्टीलची दानपेटी फोडून २००० रुपये, गाळा नंबर १ दुकानातील काऊंटर ड्राव्हरमधील रोख रक्कम १०४००,गाळा नंबर २ दुकानाच्या काउंटर ड्राव्हरमधील रोख २०००,गाळा नंबर ३ काउंटर ड्राव्हरमधील १००० रुपये, गाळा नंबर ४ ड्राव्हरमधील ६५०० रुपये, गाळा नंबर ५ ड्राव्हरमधील रोख ३००० रुपये, गाळा नंबर ७ ड्राव्हरमधील ३००० रुपये असा एकूण २८४०० रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाले. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली असून पोलिसांची सुरक्षा वाढविण्याबरोबरच सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड