शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या बापाची केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 22:11 IST

विवाहित असणाऱ्या आरोपी मुलीला अटक करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देघटना घडली तेव्हा घरात दोघेच होते अशी माहिती पुढे येत आहे. अतिप्रसंगास विरोध करत असताना मुलीने घराच्या कोपऱ्यात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि अनेक प्रहार केले. काही वेळाने इतर नातेवाईक आले तेव्हा त्यांनी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचं पाहिले.

नवी दिल्ली - बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या बापाची २६ वर्षीय मुलीने कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात आज ही घटना घडली आहे. विवाहित असणाऱ्या आरोपी मुलीला अटक करण्यात आली आहे. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी एका कार्यक्रमानिमित्ताने घरी आली असताना हा धक्कादायक प्रकार घडला. घटनेच्या रात्री मुलगी कार्यक्रमाहून आल्यानंतर घरी झोपली होती. यानंतर काही वेळाने तिचे वडील खोलीत आले आणि जबरदस्ती करु लागले. मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता वडिलांनी जास्तच जबरदस्ती करण्यास सुरुवात केली अशी माहिती मिळाली आहे. घटना घडली तेव्हा घरात दोघेच होते अशी माहिती पुढे येत आहे. 

अतिप्रसंगास विरोध करत असताना मुलीने घराच्या कोपऱ्यात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि अनेक प्रहार केले. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला. काही वेळाने इतर नातेवाईक आले तेव्हा त्यांनी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचं पाहिले. याबाबत चौकशी केली असता मुलीने घडल्या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी घटनेला दुजोरा दिला असून नेमकं कारण काय आहे याचा तपास पोलीस करत आहे. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळRapeबलात्कार