शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

धक्कादायक! जमिनीच्या वादातून पत्नीने घेतला पतीचा चावा

By नितीन पंडित | Updated: December 13, 2022 19:15 IST

भिवंडीत रविवारी घडली घटना

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: जमिनीच्या वादातून महिलेने आपल्या पतीच्या बोटाला व गालाला चावा घेतल्याची खळबळ जनक घटना भिवंडीत रविवारी घडली असून याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात सोमवारी पत्नीसह मुलाविरोधात जखमी वृद्धाने गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश मारुती ठाकूर वय ६७ वर्ष रा ठाकऱ्याचा पाडा भिवंडी असे पत्नीने चावा घेतलेल्या वृद्ध पतीचे नाव आहे तर सुनंदा प्रकाश ठाकूर वय ५५ वर्ष व स्वप्नील प्रकाश ठाकूर वय १९ असे गुन्हा दाखल झालेल्या पत्नी व मुलाचे आहे.

प्रकाश ठाकूर यांच्या कुटुंबीयांच्या सामायिक जमिनीवर पत्नी सुनंदा ठाकूर यांनी आपल्या नावावर जमीन करण्याचा तगादा प्रकाश ठाकूर यांना लावला होता, मात्र सदरची जमीन ही कुटुंबीयांची सामायिक जमीन असल्याने याबाबत घरातील मंडळींना एकत्र करून याबाबतचा निर्णय घेऊ, असे प्रकाश यांनी आपली पत्नी सुनंदा यांना समज दिली होती.मात्र त्यात सुनंदा यांचे समाधान न झाल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले व सुनंदा यांनी पती प्रकाश ठाकूर यांच्या डाव्या हाताच्या तर्जनी बोटास व उजव्या गालाला चावा घेऊन प्रकाश ठाकूर यांना जखमी केले तर मुलगा स्वप्नील ठाकूर याने जमीन आईच्या नावावर केली नाही तर बघून घेईन अशी धमकी देत शिवीगाळ केली.याप्रकरणी जखमी प्रकाश ठाकूर यांनी पत्नी व मुला विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे