गुजरात - १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आजारी पडली, तेव्हा तिच्या कुटुंबियांनी तिला तांत्रिककडे नेले. तांत्रिकाने तिच्या घरच्यांना सांगितले की, तुम्ही बाहेरच बसा, मी आत तिच्यावर उपचार करतो. थोड्या वेळाने आतून किंचाळणं ऐकलं तेव्हा कुटुंबीयांनी आत धाव घेतली. झोपडीत ती मुलगी कपड्यांशिवाय पलंगावर पडली होती आणि तेथे रक्तस्त्राव झाला होता. ही धक्कादायक घटना गुजरातमधील पाटन येथील आहे.पाटन जिल्ह्यातील गावात दलित कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगी सतत आजारी असायची. तिच्या कुटुंबियांनो बर्याच ठिकाणी उपचार केले पण काही उपयोग झाला नाही. मुलीची तब्येत ठीक नसल्याने कुटुंब राधनपूरमध्ये एका तांत्रिककडे पोहोचले. तांत्रिकने दररोज पाच रविवारी येण्यास सांगितले, परंतु तांत्रिकने मुलीला पाहताच त्याची नियत बदलली. त्याने शुक्रवारी रात्रीच मुलीला आणण्यास सांगितले.
धक्कादायक...कुटुंबीयांना बाहेर बसवून तांत्रिक मुलीवर बलात्कार करत होता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 16:30 IST
ही धक्कादायक घटना गुजरातमधील पाटण येथील आहे.
धक्कादायक...कुटुंबीयांना बाहेर बसवून तांत्रिक मुलीवर बलात्कार करत होता
ठळक मुद्देझोपडीत ती मुलगी कपड्यांशिवाय पलंगावर पडली होती आणि तेथे रक्तस्त्राव झाला होता. मुलीच्या किंचाळ्याचा आवाज ऐकताच कुटुंबायांनी झोपडीकडे धाव घेतली.