शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयातून दोन मुलांसह जावयानेच केला घात

By संजय तिपाले | Updated: December 13, 2023 17:58 IST

गडचिरोलीतिहेरी हत्याकांडाचा उलगडा: ९ जणांना अटक, सहा महिन्यांपूर्वीच रचला होता कट

गडचिरोली: भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलप्रभावित गुंडापुरी गाव तिहेरी हत्याकांडामुळेे हादरले होते. घटनेनंतर सातव्या दिवशी या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. दोन मुलांसह जावई व गावातील इतर सहा जण अशा सर्वांनी मिळून वृध्द दाम्पत्यासह नातीचा खून केल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे.  

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी १३ डिसेंबरला पत्रकार परिषदेत याबद्दल सविस्तर माहिती दिली. अपर अधीक्षक यतीश देशमुख, एम.रमेश, उपअधीक्षक बापूराव दडस यांची उपस्थिती होती. देवू दसरु कुमोटी (६०), बिच्चे देवू कुमोटी (५५,रा. गुंडापुरी ता. भामरागड) व अर्चना रमेश तलांडी (१०,रा.येरकल ता.एटापल्ली), अशी मयतांची नावे आहेत. देवू कुमोटी हे गावात पुजारी म्हणून काम करत, शिवाय ते जादूटोणा करत. आजारी रुग्णही त्यांच्याकडे जात. त्यांनी काही रुग्णांना बरे केल्याने ते परिसरात प्रसिध्द होते, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांच्याकडे गेलेल्या काही रुग्णांचा मृत्यू झाला. 

जादूटोणा करुन देवू कुमोटी हे बरे करण्याऐवजी बळी घेत असल्याचा संशय   तयार झाला. यातून देवू कुमोटी यांच्याकडे उपचारासाठी येऊन आप्तस्वकियांना गमावलेल्यांमध्ये रोष तीव्र होत गेला. काही लोक देवू कुमोटी यांची मुले रमेश  व विनू यांना टोमणे मारत, शिवाय दहा वर्षांपूर्वी देवू यांचा जावई तानाजी कंगाली (रा.विसामुंडी ता. भामरागड) याची दोन वर्षांची मुलगी आजारी पडल्यानंतर देवू यांच्याकडे उपचारासाठी नेली, पण तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यामुळे जावयाच्या मनातही सासऱ्याबद्दल राग होता. 

सहा महिन्यांपासून या तिघांसह गावातील लोकांनी देवू कुमोटी यांना संपविण्याचा कट रचला. ६ डिसेंबरला धान मळणीसाठी देवू कुमोटी, त्यांची पत्नी बिच्चे कुमोटी व नात (मुलीची मुलगी) अर्चना तलांडी हे तिघे गुंडापुरी शिवारातील झोपडीत झोपले होते. नऊ जणांनी मिळून लोखंडी हातोडा व धारदार सुरीने सुरुवातीला देवू नंतर बिच्चे व शेवटी अर्चनाचा गळा चिरुन निर्दयीपणे संपवले. विनू कुमोटी याच्या फिर्यादीवरुन बुर्गी (येमली) पोलिस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. ऐन नक्षल सप्ताहात तिहेरी हत्याकांड घडल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान होते.

संपूर्ण परिवाराला संपविण्याची मिळाली होती धमकी....फिर्याद देताना विनू कुमोटी याने कोणावरही संशय नाही, असे स्पष्टपणे पोलिसांना सांगितले होते, त्यामुळे पोलिसांसाठी गुन्ह्याची उकल करणे कठीण बनले होते. मात्र, दोन दिवसांनी विनू कुमोटी याने घटनेच्या दोन दिवस आधी अज्ञात दोन व्यक्तींनी संपूर्ण परिवाराला संपविण्याची धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुरुवातीला ही माहिती दडवल्याने पोलिसांचा संशय बळावला, पाच पथकांनी केलेल्या तपासानंतर संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा झाला. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी