शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुंबईत 45 वर्षीय महिलेचा संशयास्पदरीत्या सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 16:19 IST

मृत महिला कुठेही काम करत नव्हती. मात्र, महिला फॅशन डिझायनर असल्याचे समजते.  आज दुपारी याबाबत ओशिवरा पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. 

मुंबई - अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला परिसरात ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह राहत्या घरात आढळला आहे. क्रॉस गेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मृत महिलेचा मृतदेह आढळला आहे. मयत महिलेचे नाव सुनीता सिंग (वय ४५) असं असून तिच्या मुलाला पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. त्यांनी पुढे सांगितले की, मृत महिला कुठेही काम करत नव्हती. मात्र, महिला फॅशन डिझायनर असल्याचे समजते. आज दुपारी याबाबत ओशिवरा पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेडरूममध्ये तिचा मृतदेह आढळला असून तिच्या बाजूला इंजेक्शनच्या सिरीन सापडल्या आहेत. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अहवालानंतरच ही आत्महत्या आहे की हत्या हे उघड होईल. याप्रकरणी तिच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलीस सध्या चौकशी करत आहेत. मृत महिलेचा मुलगा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एका मुलीसोबत राहत असून आई आणि मुलगा दोघांनाही अमली पदार्थाचे व्यसन होते. अलीकडेच ओशिवरा येथील मालकी हक्काचा फ्लॅट सुनीता यांनी विकला होता. त्यातून मिळालेल्या पैशावरूनच हा आई आणि मुलात वाद झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. क्रॉस गेट या इमारतीत सिंग कुटुंबीय भाडेतत्वावर राहत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून