शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! शास्त्रज्ञाच्या पत्नीवर पुजाऱ्याने केला बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 21:37 IST

शास्त्रज्ञ पतीकडून ३ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला. 

ठळक मुद्देपीडित दाम्पत्य चेंबूर परिसरात राहण्यास आहे.मुलगा बरा करण्याच्या विधीसाठी त्याने महिलेच्या पतीकडून २ लाख ९८ हजार रुपयेही उकळले होते.बलात्कार, खंडणी, धमकावणे, जादुटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - तंत्र - मंत्राने मुलाचा कॅन्सर बरा करतो अशी बतावणी करत एका शास्त्रज्ञाच्या उच्चशिक्षित पत्नीवर पुजाऱ्याने बलात्कार केला. इतक्यावरच तो भामटा पुजारी न थांबता त्याने त्याचे चित्रिकरण करून महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच शास्त्रज्ञ पतीकडून ३ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला. 

या महिलेच्या मुलाचा मागच्या वर्षी मृत्यू झाला आहे. शेवटी तिने घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित दाम्पत्य चेंबूर परिसरात राहण्यास आहे. दोघेही उच्चशिक्षित आहेत. पती शास्त्रज्ञ आहे. त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्याला कॅन्सर असल्याचे निदान २०१७ साली झाले होते. त्यानंतर त्याच्यावर इलाज सुरु करण्यात आला. मात्र औषधाचा फरक पडत नसल्याने त्याच्या आईने एका मंदिरातील पुजाऱ्याची भेट घेतली. विशिष्ट मंत्रसिद्धीने मुलगा बरा होऊ शकतो असे बतावणी त्याने महिलेशी केली. मुळच्या उज्जैनच्या असलेल्या पुजाऱ्याने महिलेच्या घरी जाऊन यज्ञ केला. यज्ञ सुरु केल्यावर महिलेचा मुलगा आणि महिलेला त्याने पवित्र राख प्राशन करण्यास सांगितले. त्यानंतर दोघेही बेशुद्ध झाले. काही वेळाने दोघेही शुद्धीवर आले. पुजारी घरातच होता. मुलाचा आजार बरा व्हावा म्हणून मी हे केले. तुमचा मुलगा लवकरच बरा होईल असे सांगितले. त्यानंतर तिच्याकडून ६० हजार रुपयांचे दागिने घेऊन तो निघून गेला.

काही दिवसांनी पुजाऱ्याने महिलेशी संपर्क केला. तिला अंधेरीतील घरी बोलवून घेतले. महिला घरी गेली तेव्हा तिच्यावर पुन्हा भामट्याने बलात्कार केला. हा कर्मकांडाचा एक भाग आहे असे त्याने तिला सांगितले. त्याने महिलेसोबतच्या कृत्याचे व्हीडीओ चित्रिकरण केले व फोटो काढले. त्याआधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मुलगा बरा करण्याच्या विधीसाठी त्याने महिलेच्या पतीकडून २ लाख ९८ हजार रुपयेही उकळले होते. मुलाच्या मृत्यूनंतरही त्याने पैसे उकळणे कायम सुरुच ठेवले. हा सर्व त्रास आणि अन्याय असह्य झाल्याने पीडित महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. दोघांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार बलात्कार, खंडणी, धमकावणे, जादुटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Rapeबलात्कारExtortionखंडणीPoliceपोलिसcancerकर्करोग