जळगाव - लग्नाचे आमिष दाखवून शहरातील एका ३० वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अक्षय गंगाधर जोशी याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, अक्षय जोशी हा तहसील कार्यालयात वेंडरचे काम करतो. दीड वर्षापासून तो पीडितेच्या संपर्कात आला. त्यातून दोघांमध्ये ओळख व प्रेमसंबंध निर्माण झाले.पीडितेच्या पतीचे ३ जुलै २०१७ रोजी निधन झाले आहे. विधवा असल्याने जोशी याने पीडितेशी लग्न करण्याची तयारी दाखविली. त्यातून त्याने वेळोवेळी पीडितेवर बलात्कार केला. जोशी याने अनेक महिलांना फसविल्यामुळे पीडितेने त्याच्यापासून संपर्क कमी केला होता. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी पीडितेच्या घरी जावून जीवे ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केला. महिला उपनिरीक्षक कांचन काळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
धक्कादायक! ३० वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 16:47 IST
महिला उपनिरीक्षक कांचन काळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
धक्कादायक! ३० वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार
ठळक मुद्दे २४ ऑगस्ट रोजी पीडितेच्या घरी जावून जीवे ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केला. पीडितेच्या पतीचे ३ जुलै २०१७ रोजी निधन झाले आहे. दोघांमध्ये ओळख व प्रेमसंबंध निर्माण झाले.