शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! कबरेतून मुलीचा मृतदेह काढून केलं अमानवीय कृत्य, पोलिसांकडून नराधमाचा खेळ खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 15:31 IST

सकाळी काही मुलांची नजरेस पडलं की, मुलीचं कबर खोदलेली आहे आणि त्यात मृतदेह नाही. त्यांनी लगेच फोन करून याची सूचना मुलीच्या वडिलांना दिली.

पाकिस्तानमधून एक संताजनक आणि माणूसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. नराधम आरोपीचं कृत्य वाचून मनाला धक्का बसेल. सिंधमध्ये गेल्या १३ ऑगस्ट रोजी जेव्हा पाकिस्तान जश्न-ए-आझादी साजरी करण्याची तयारी करत होता. त्याच दिवशी सिंध प्रांतातील थट्टा जिल्ह्यातील असरफ चांडीओ गावात दफन करण्यात आलेल्या एका १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आरोपीने कबरीतून बाहेर काढला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कारासारखं अमानवीय कृत्य केलं. 

'आजतक'ने दिलेल्या वृत्तानुसार, आमना चांडीओ नावाच्या मुलीचा एक दिवसाआधी तापामुळे मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह सर्व रितीरिवाजासोबत दफन करण्यात आला होता. पण त्याच रात्री एका माथेफिरू व्यक्तीने मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला आणि तेथून अर्धा किलोमीटर अंतरावर झाडामागे जाऊन तिच्या मृतदेहवर अत्याचार केला. नंतर मृतदेह तिथेच सोडून फरार झाला. या व्यक्तीचं नाव रफीक चांडीओ असून तो या भागातील गुंड आहे.

सकाळी काही मुलांची नजरेस पडलं की, मुलीचं कबर खोदलेली आहे आणि त्यात मृतदेह नाही. त्यांनी लगेच फोन करून याची सूचना मुलीच्या वडिलांना दिली. वडील आणि गावातील लोक घटनास्थळी पोहोचले. पोलिसही आले आणि मृतदेह शोधण्याचं काम सुरू झालं. काही वेळाने एका झुडपात मुलीचा मृतदेह त्यांना सापडला. मुलीच्या शरीरावरून कफन गायब होतं. कपडेही निट नव्हते. पोलिसांनी लगेच मृतदेह हॉस्पिटलला नेला आणि तिथे डॉक्टरांनी तिच्यावर अत्याचार झाल्याचं सांगितलं. (हे पण वाचा : खुर्चीला बांधून दिला इलेक्ट्रिक शॉक; पत्नीनेच केला पतीचा खेळ खल्लास)

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण आहे. लोक पोलिसांविरोधातही आपली नाराजी जाहीर करत आहेत. मुलीचे वडील रमजान चांडीओने पोलिसांवर आरोप केला की, सूचना मिळाल्यावर बरेच उशीरा पोलीस आले आणि ज्याच्यावर आम्हाला शंका आहे त्याला पकडण्यात काही इंटरेस्ट दाखवला नाही. काही परिवारांनी गुंड आरोपीला थेट गोळी मारण्याची मागणी केली. 

या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि आरोपीला पकडण्यासाठी टीम तयार केल्या. छापेमारी करत रफीक चांडीओला एका झुडपातून पकडण्याच्या प्रयत्न करण्यात आला. पण यावेळी आरोपीने पोलिसांवर गोळ्या झाडल्या. पोलिसांनीही त्याच्यावर फायरिंग केली आणि त्याचा खेळ खल्लास केला.

एसएसपी डॉ. इमरान खान म्हणाले की आरोपी रफीक चांडीओ एक सराईत गुन्हेगार आहे. तो गेल्या १० वर्षांपासून लूटमार, प्रॉपर्टीवर ताबा मिळवणे असे गुन्हे करतो. याआधीही तो तुरूंगात गेला होता. पाकिस्तानात घडलेली अशाप्रकारची क्रूर घटना पहिली नाही. याआधी २०१९ मध्ये कराचीमध्येही अशी घटना घडली होती. तेव्हा महिलेचा मृतदेह बाहेर काढून रेप करण्यात आला होता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ