शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

धक्कादायक! मध्यप्रदेशमध्ये सामुहिक बलात्कार पिडीतेचा एफआयआर नोंदविला नाही; गळफास घेतला

By हेमंत बावकर | Updated: October 3, 2020 08:10 IST

Narsinghpur Gang Rape case : पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्यांना मेडिकल तपासणी करण्यास सांगितले. पुढील दिवशी जेव्हा ते हा तपासणी अहवाल घेऊन पोलीस ठाण्यात गेले तेव्हा पोलिसांनी पिडितेच्या कुटुंबाला बसवून ठेवले. तसेच त्यांना सोडण्यासाठी पिडीतेकडेच पैशांची मागणी करण्यात आली.

नरसिंहपुर : मध्य प्रदेशच्या नरसिंहपुरमध्ये हाथरससारखाच प्रकार समोर आला आहे. येथील एका महिलेवर सामुहिक बलात्कार (Gang Rape with Dalit Woman)  झाला. मात्र, चार दिवसांपासून प्रयत्न करूनही पोलिसांनी एफआय़आर दाखल करून घेतला नाही. कुटुंबासोबत रोज पिडीता पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत राहिली. उलट पोलिसांनी तिला शिवीगाळ करत पैसे मागितले. अखेर पिडीतेने गळफास घेऊन जीवन संपविल्याचा (Rape Victim Commits suicide) धक्कादायक प्रकार घडला आहे.  

या प्रकरणाने वाद निर्माण होताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारने एएसपी आणि एसडीओपींची उचलबांगडी केली आहे. याशिवाय एफआयआर नोंदवून न घेणाऱ्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. 28 सप्टेंबरचे हे प्रकरण आहे. रिछाई गावात राहणाऱी महिला शेतात चारा कापण्यासाठी गेली होती. तेव्हा शेजारी राहणाऱ्या तीन आरोपींनी शेतातच तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पिडीता आणि तिचे कुटुंबीय गोटिटोरिया आणि चिचली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी सारखे जात होते. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला नाही. पोलिसांच्या वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या पिडीतेने घरातच फास लावून घेतला. 

पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्यांना मेडिकल तपासणी करण्यास सांगितले. पुढील दिवशी जेव्हा ते हा तपासणी अहवाल घेऊन पोलीस ठाण्यात गेले तेव्हा पोलिसांनी पिडितेच्या कुटुंबाला बसवून ठेवले. तसेच त्यांना सोडण्यासाठी पिडीतेकडेच पैशांची मागणी करण्यात आली. पिडितेच्या सासऱ्यांनी केलेल्या आरोपांनुसार पोलिसांनी तिला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच आपल्या विरोधात 151 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री 9 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यातच कोंडून ठेवण्यात आले.  पैसे घेतल्यानंतरच घरी पाठविण्यात आले. चार दिवस पोलीस आम्हाला भटकवत राहिले. यामुळे पिडीतेने कंटाळून आत्महत्या केली. 

या प्रकरणाने उत्तर प्रदेशसारखी परिस्थिती दिसू लागताच शिवराज सिंहांनी शुक्रवारी रात्री उशिराने तत्काळ कारवाईचे आदेश दिले. दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांना हटविण्यात आले असून पोलीस ठाण्याच्या इनचार्जलाही अटक करण्यात आली आहे. सुट्टीवर गेलेल्या एसपींकडूनही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानPoliceपोलिसHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार