शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली हादरली! चाकूचे ४० वार, मग दगडांनी ठेचून १६ वर्षांच्या मुलीची हत्या, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 13:38 IST

Murder Video Viral: अंगावर काटा आणणारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये झाला कैद, आरोपी अटकेत

16 year old girl stabbed: नवी दिल्लीत अल्पवयीन मुलीच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या व्यक्तीने 16 वर्षीय मुलीची चाकूने वार करत आणि दगडाने ठेचून हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, वाद सुरू असताना त्याने तरुणीला रस्त्यात थांबवले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मुलीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ इतका भयानक आहे की तो दाखवताही येऊ शकत नाही. दरम्यान, मुलीचा मारेकरी साहिल याला बुलंदशहर येथून अटक करण्यात आली आहे.

नक्की काय घडलं?

दिल्लीच्या बाहेरील उत्तरेला शाहबाद डेअरी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. एकाने पोलिसांना फोन करून मुलीवर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आणि तातडीने घटनास्थळी येण्यास सांगितले. पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची चौकशी केली. ही अल्पवयीन मुलगी रस्त्यावरून जात असताना अचानक एका मुलाने तिला अडवून तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने मुलीला दगडाने ठेचून ठार केले.

हल्ल्याचे कारण काय?

पोलीस तपासात आरोपीचे नाव साहिल असून वडीलांचे नाव सर्फराज असल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलगीही दिल्लीची रहिवासी होती. साहिल आणि ती मुलगी रिलेशनशिपमध्ये असल्याचे पोलिसांनी, मिळालेल्या माहितीनुसार सांगितले. प्रेम संबंधातील मतभेदामुळे रविवारी त्यांच्यात वाद झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जात असताना साहिलने तिला रस्त्यातच अडवले. दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने साहिलने मुलीवर चाकूने हल्ला केला.

आरोपी साहिल तरुणीवर चाकूने वार करत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यावेळी लोक रस्त्यावरून ये-जा करताना दिसत होते. पण कोणीही हस्तक्षेप करायला तयार नव्हते. सतत चाकूने हल्ला करून साहिल घटनास्थळावरून फरार झाला. दुसरीकडे, जखमी मुलीला घटनास्थळावरून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या वडिलांनी या संबंधी शाहबाद डेअरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. सध्या आरोपी साहिल फरार असून त्याच्या शोध सुरू आहे.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी