शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! हळदीच्या साडीने गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 19:15 IST

लग्नाच्या आदल्या दिवशी धक्कादायक घटना

शिऊर : लग्नाच्या एक दिवस आधीच वधूने आपल्या प्रियकरासमवेत शेतातील लिंबाच्या झाडाला अंगावरील हळदीच्या साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना शनिवारी पहाटे वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथे घडली. त्यामुळे कोल्ही परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सतीश अशोक पवार (२३) व पूजा रमेश पवार (२२), असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. या घटनेविषयी मिळालेली माहिती अशी की, पूजाचे लग्न सावळीवीर येथे जमले होते. हे लग्न रविवारी (दि.३१) सकाळी लागणार होते. त्यामुळे तीनदिवसीय हळदी सभारंभाचे आयोजन नवरी मुलीच्या घरी करण्यात आले होते. त्याकरिता नवरा मुलगाही आपल्या काही नातेवाईकांसह कोल्ही येथे आला होता. शुक्रवारी रात्री नववधू व वरास मोठ्या उत्साहात हळद लावण्यात आली. सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच शनिवारी पहाटेदरम्यान, या प्रेमीयुगुलाने शेत गट.क्र. १६३३ मध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाला अंगावरील हळदीच्या साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना उघडकीस आल्यानंतर शिऊर पोलीस ठाण्याचे सपोनि. सत्यजित ताईतवाले, पोहेकॉ. आर.आर. जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मयत प्रेमीयुगुलांचे मृतदेह शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उलटसुलट चर्चांना उधाणपूजा व सतीश हे आंतरजातीय असल्याने त्यांच्या या प्रेम प्रकरणाला घरचा विरोध असल्याकारणाने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या दोघांचे प्रेमसंबंध होते तर हे दोघेही हळदीच्या आधीच पळून गेले असते. त्यांनी असे न करता आत्महत्या का केली, अशा उलटसुलट चर्चांना मात्र उधाण आले आहे.

आई-वडिलांना एकुलती एक मुलगीसकाळी ही घटना नवऱ्या मुलास कळताच तो आपल्या नातेवाईकासह आपल्या घरी निघून गेला. पूजा ही आपल्या आई-वडिलांना एकुलती एक मुलगी होती. ती आपल्या कुटुंबासमवेत कोल्हीपासून दीड दोन कि.मी. अंतरावर नाईकवाडी येथे राहत होती, तर सतीश याची वस्तीही त्यांच्यापासून काही अंतरावर आहे. सतीश हा गेल्या दोन महिन्यांपूर्वीच लॉकडाऊनमुळे कोल्ही येथे आला होता. तो यापूर्वी कामानिमित्त शिर्डी येथे राहत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद