शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 22:04 IST

हल्लेखोरांनी चौघांवर अंदाधूंद गोळीबार केला. 5 आणि 2 वर्षीय चिमुकल्यांनाही सोडले नाही.

UP Crime : उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. घरात घुसून एका सरकारी शिक्षकासह त्यांची पत्नी आणि चिमुकल्या दोन मुलांची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. मात्र, तोपर्यंत आरोपींनी पळ काढला होता. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवरतनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहोर्वा भवानी चौकात ही हत्या घडली. मृत शिक्षक सुनील भारती हे कुटुंबासह अहोर्व भवानी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. सुनील जिल्ह्यातील सिंगपूर ब्लॉकमधील प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून होते. ते मूळ रायबरेली जिल्ह्यातील जगतपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सुदामापूर गावचे रहिवासी होते. सुनीलच्या कुटुंबात पत्नी पूनम भारती, मुलगी दृष्टी (5) आणि दोन वर्षांचा मुलगा होते.

पती, पत्नी आणि दोन मुलांची हत्याआज, गुरुवारी सायंकाळी अचानक काही हल्लेखोर सुनील यांच्या घरात घुसले आणि त्यांनी अंदाधूंद गोळीबार सुरू केला. या घटनेत सुनीलसह त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी भवानी चौकातून पळून गेले. गोळ्यांचा आवाज ऐकून लोक घटनास्थळी पोहोचले. लोकांनी तत्काळ शिवरतनगंज पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. 

सीएम योगींनी घेतली घटनेची दखलघटनेची माहिती मिळताच अमेठीचे एसपी अनुप सिंहही घटनास्थळी पोहोचले. एसपींनी पोलिसांचे पथक तयार करून हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना दिल्या. सीएम योगी यांनीही या घटनेची दखल घेतली. मुख्यमंत्री योगी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून, अधिकाऱ्यांना तातडीने आरोपींना पकडून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

हत्या का करण्यात आली?पोलिसांच्या माहितीनुसार, मृत सुनील यांनी पोलिसांत एक तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीमुळे हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. त्या अँगलने सध्या तपास केला जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीyogi adityanathयोगी आदित्यनाथ