शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कत्तीने कापून पत्नीची क्रूर हत्या;मृतदेहाचे तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 19:38 IST

पहाटे अर्धा भाग नाल्यात जाळल्याने घटना आली उघडकीस

ठळक मुद्देदोघांनी केला होता प्रेम विवाह काही दिवसांपासून दोन्ही मुलांना ठेवत असे सोबत

माजलगाव : शहरातील अशोकनगर भागात सोमवारी सकाळी नाल्याच्या कडेला अर्धवट जळालेला मानवी सांगडा आढळुन आल्याने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून तपास लावल्याने सदरील प्रेत रेश्मा संजय साळवे हिचे असल्याचे स्पष्ट झाले. पतीनेच घरात नऊ दिवसांपूर्वी तिची क्रूर हत्या करून प्रेताचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. आज सोमवारी कंबरेपासून वरचा भाग नाल्याच्या काठावर जाळून नष्ट केला त्यावरून ही हत्या उघड झाली. 

सोमवारी अशोकनगरखालच्या भागात आसलेल्या नाल्याच्या कडेला अर्धवट अवस्थेत जळालेला मानवी सांगाडा आढळुन आला, प्रेताचे पुर्ण शरीर या ठिकाणी कोणीतरी जाळुन टाकले आसल्याचे दिसुन आले. या घटनेने मोठी खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक सुलेमान यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली व वरिष्ठांना माहिती दिली, त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत ढीसले यांनी भेट दिली. या परिसरातल्या नागरिकांनी पहाटे एक व्यक्ती हातात बकेट घेऊन व दोन मुलांना सोबत घेऊन आला होता ही माहिती पोलिसांना दिली तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही असल्याचे सांगितले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची अधिक माहिती घेण्यास सुरु केले. गोपनीय माहितीच्या आधारे त्यांना रेश्मा ही महिला मागील आठ दिवसापासून बेपत्ता असल्याचे कळाले, त्यावरून पोलीस निरीक्षक सुलेमान यांनी चक्रे फिरवून संजय साळवे यास तत्काळ ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने दि.३० नोव्हेंबरला रेशमाची कत्तीने क्रूर हत्या केल्याचे निष्पन्न झाले. 

पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन तपासणी केली असता घरात जाळपोळ केल्याचे दिसून आले तेथे वास येत असल्याने फ्रीज तपासणी केली असता फ्रीजमध्ये तिच्या शरीराचे कमरेखालील भागाचे तुकडे आढळुन आले.या हदरवणारी घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी भेट दिली. शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

दोघांनी केला होता प्रेम विवाह अशोकनगर भागात राहणाऱ्या संजय साळवे व इंदिरानगर भागात राहणारी रेश्मा पठाण यांनी दोन्ही कुटुंबाचा विरोध डावलून लग्न केले होते. संजय याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता व अब्दुल रहमान या नावाने फातेमानगर मंजरथ रोड येथे रेश्मासोबत रहात होता. या दाम्पत्यास  एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले होती. अवघ्या चार तासात पोलिसांनी पती संजय रंगनाथ साळवे उर्फ अब्दुल रहमान यास अटक करून त्याच्या घरातील फ्रीजमध्ये ठेवलेले रेशमाच्या शरीराचे तुकडे जप्त केले आहेत. या घटनेने शहर हादरून गेले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादMurderखूनPoliceपोलिसBeedबीड