शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आई, पत्नी, दोन मुलांची हत्या करून स्वतः घेतला गळफास लावून 

By पूनम अपराज | Updated: November 17, 2020 19:38 IST

Murder and Suicide : छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देरायपूरचे एसएसपी अजय यादव यांनी सांगितले की, केंद्री गावात राहणाऱ्या कमलेश साहूने पत्नी, आई आणि दोन मुलांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत: ला गळफास लावून घेतला.

रायपूरमध्ये सोमवारी रात्री एका युवकाने आपल्या आई, पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन स्वत: ला गळफास लावून घेतला. हे प्रकरण अभनपूरमधील केंद्री गावचे आहे. मंगळवारी सकाळी शेजार्‍यांनी या घटनेची माहिती दिली. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, आजारामुळे कुटुंब काळजीत होते असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.रायपूरचे एसएसपी अजय यादव यांनी सांगितले की, केंद्री गावात राहणाऱ्या कमलेश साहूने पत्नी, आई आणि दोन मुलांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत: ला गळफास लावून घेतला. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांना कमलेशचा मृतदेह लटकलेला असताना त्याची आई, पत्नी व दोन्ही मुलांचे मृतदेह जमिनीवर आढळले होते.गावकऱ्यांनी कुटुंब आजाराने त्रस्त होते असल्याचे सांगितले 

एसएसपीच्या म्हणण्यानुसार ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, कुटुंबातील सदस्य कोणत्यातरी आजाराने त्रस्त झाले होते. हे घटनेमागील कारण असू शकते. मात्र, पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकलेले नाहीत.गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले

छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, एकाच कुटुंबातील पाच लोकांचा मृत्यू होणे ही मोठी गोष्ट आहे. मी घटनेचे कारण लवकरात लवकर शोधण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याMurderखूनChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिस