शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

धक्कादायक! देशात २०२३ मध्ये हुंड्याच्या गुन्ह्यांमध्ये १४ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:47 IST

हुंड्यासाठी महिलांचा छळ होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आहे.

नवी दिल्ली : हुंड्यासाठी महिलांचा छळ होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आहे. २०२३ या वर्षात हुंड्याच्या गुन्ह्यांमध्ये १४ टक्के वाढ झाली. या वर्षात देशभरात हुंड्याशी निगडित १५ हजारांहून अधिक गुन्हे नोंद झाले असून ६१०० हून अधिक महिलांची हत्या झाल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे.

२०२३ या वर्षात हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत १५,४८९ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापूर्वीच्या २०२२ व २०२१ या वर्षांत हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनुक्रमे १३,४७९ व १३,५६८ गुन्हे नोंद झाल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे. उत्तर प्रदेशात या कायद्यांतर्गत सर्वाधिक ७,१५१ गुन्हे नोंदवण्यात आले. त्याखालोखाल बिहारचा क्रमांक लागत असून, ३ हजार ६६५ गुन्हे नोंदवण्यात आले. 

उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक हुंडाबळीची नाेंदएनसीआरबीच्या अहवालानुसार उत्तर प्रदेशात २,१२२, तर बिहार राज्यात १,१४३ महिलांची हत्या झाली. मात्र, या वर्षात देशभरातील ८३३ खून प्रकरणांत हुंडाबळी हे कारण नमूद केले आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत २०२३ मध्ये ८३,३२७ खटल्यांवर सुनावणी झाली. या कायद्यांतर्गत २७,१५४ लोकांना अटक झाली होती. त्यांत २२,३२७ पुरुष व ४८३८ महिलांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shocking: Dowry Crimes in India Surge 14% in 2023

Web Summary : Dowry-related crimes surged 14% in India in 2023, reveals NCRB data. Over 15,000 cases were registered, with over 6,100 women killed. Uttar Pradesh recorded the highest number of cases and dowry deaths, followed by Bihar. Trials involved 83,327 cases and 27,154 arrests.
टॅग्स :dowryहुंडाIndiaभारत