थ्रिस्सूर - लॉकडाऊनदरम्यान दारूची दुकानं बंद असल्याने आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना असावी. केरळमध्ये आज सकाळी केचेरीनजीक असलेल्या थुव्वानूर येथे झाडाला लटकलेली ३८ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे नाव कुलंगर वित्तील सनोज असं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीस दारूचे व्यसन होते, त्याला दररोज दारू लागत असे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर सर्व दारूची दुकानं बंद असल्याने तो दारू मिळत नसल्याने निराश होता.
धक्कादायक! दारुची दुकाने बंद झाली म्हणून व्यथित तळीरामाने आत्महत्याच केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 16:42 IST
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर सर्व दारूची दुकानं बंद असल्याने तो दारू मिळत नसल्याने निराश होता.
धक्कादायक! दारुची दुकाने बंद झाली म्हणून व्यथित तळीरामाने आत्महत्याच केली
ठळक मुद्देमृत व्यक्तीचे नाव कुलंगर वित्तील सनोज असं आहे.केरळमध्ये आज सकाळी केचेरीनजीक असलेल्या थुव्वानूर येथे झाडाला लटकलेली ३८ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला.