शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आणखी एका रुग्णालयात रॅगिंगच्या दहा विद्यार्थ्यांविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 17:31 IST

आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी माहितीच्या अधिकारात काढलेल्या माहितीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

ठळक मुद्दे रॅगिंगसंदर्भात कोणत्याही विद्यार्थ्यांला दंड आकारण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही. अद्यापपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंगसंदर्भात गुन्हे नोंदविण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही  2015 पासून रॅगिंग विरोधी समितीच्या एकूण 11 बैठका पार पडल्या आहेत.

मुंबई -  नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवीने रॅगिंग कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी माहितीच्या अधिकारात काढलेल्या माहितीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय (कूपर)  रुग्णालयातील दहा विद्यार्थ्यांविरोधात रुग्णालय प्रशासनाकडे रॅगिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने थातुरमातुर कारवाई करत ही प्रकरण निकालात काढली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी रुग्णालय प्रशासनाकडे रॅगिंगसंदर्भात विद्यार्थ्यांविरुद्ध आलेल्या तक्रारींबाबत माहिती मागितली होती. या माहिती संदर्भात जनमाहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी हे.मि. सावंत यांनी माहिती पुरविले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात दहा विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तरी 2016 मध्ये रॅगिंग संदर्भात 5 विद्यार्थ्यांविरुद्ध शिस्तभंग वर्तणूक केलेल्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच  2018 मध्ये रॅगिंगसंदर्भात 5 विद्यार्थ्यांविरुद्ध अर्वाच्य भाषेचा वापर आणि धमकाविणे याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच रॅगिंग संदर्भात 2016 मध्ये या तक्रारी अनुषंगाने 5 विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वसतिगृहातून 6 महिन्यांकरीता निलंबित करण्यात आलेल्या आहे.  2018 मध्ये सदर तक्रारी अनुषंगाने 3 विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वसतिगृहातून 6 महिन्यांकरीता निलंबित करण्यात आलेल्या आहे.तसेच रॅगिंगसंदर्भात कोणत्याही विद्यार्थ्यांला दंड आकारण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही. तसेच बरखास्ती करण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही आणि अद्यापपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंगसंदर्भात गुन्हे नोंदविण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही अशी बेजबाबदार माहिती दिल्याचे शकील शेख यांनी सांगितले. हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय (कूपर) रुग्णालयातील अहवालानुसार सन 2015 पासून रॅगिंग विरोधी समितीच्या एकूण 11 बैठका पार पडल्या आहेत. तर रॅगिंगप्रकरणी समितीने आतापर्यंत 8 विद्यार्थ्यांवर फक्त 6 महिन्यांकरीता वसतिगृहातून निलंबनाची कारवाई केल्याच समितीचं म्हणणं आहे. रॅगिंगच्या तक्रारीविरोधात रॅगिंग विरोधी समितीने गांभीर्याने चौकशी करत नसून फक्त थातुरमातुर कारवाई करत आहे. ज्यामुळे वेळीच कारवाई केली डॉ.पायल तडवी आत्महत्यासारखी दुर्दैवी घटना घडू शकते असं मत आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी व्यक्त केले आहे. 

>

टॅग्स :payal tadvi suicideपायल तडवीhospitalहॉस्पिटलRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताMumbaiमुंबई