शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

धक्कादायक! नक्षलवाद्यांकडून दोघांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 19:43 IST

हत्ती कॅम्पमध्ये तोडफोड; रस्ताही अडवला

ठळक मुद्दे पीएलजीए सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी धुमाकूळपीएलजीए सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने दुर्गम भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मासो डेबला पुंगाटी (५५) व ऋषी लालू मेश्राम (५०) अशी हत्या झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

एटापल्ली/कमलापूर(गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पुरसलगोंदी येथील दोन नागरिकांची रविवारच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केली. दुसरीकडे कमलापूर हत्ती कॅम्पमध्येही तोडफोड करत आणि मार्ग अडवत बॅनरबाजी केली. पीएलजीए सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने दुर्गम भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मासो डेबला पुंगाटी (५५) व ऋषी लालू मेश्राम (५०) अशी हत्या झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. मासो हा पुरसलगोंदी येथील गाव पाटील आहे तर ऋषी हा कृषीमित्र म्हणून गावात काम करीत होता. रविवारच्या रात्री ७० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी सर्वप्रथम गावाला घेराव घातला. त्यानंतर दोघांनाही झोपेतून उठवून दोघांचेही हात बांधले. त्यांच्या घरातील कागदपत्रे व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकले. दोघांच्याही कुटुंबियांनी प्रचंड विरोध केला मात्र त्यांना घरात कोंडून ठेवले. मारहाण करीतच त्यांना गावाबाहेर नेले. त्यानंतर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.सोमवारी सकाळी त्यांचे मृतदेह आढळले. जवळच एक चिठ्ठी टाकली होती. या दोघांनीही सुरजागड लोहप्रकल्पासाठी पैसे घेतले व ते त्या कामावर जात होते, तसेच ते पोलिसांचे खबरी होते, असा आरोप चिठ्ठीत करण्यात आला आहे. दुसरीकडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मासो पुंगाटी हे नक्षल समर्थक असल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. ते दोघेही सुरजागडच्या खाणीत कामावर जात असल्याचा राग मनात धरून नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी कळविले. २ ते ८ डिसेंबरपर्यंत नक्षलवाद्यांकडून पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गुरिला आर्मी) या नक्षल संघटनेचा वर्धापन दिन सप्ताह पाळला जात आहे. त्याच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी हा धुमाकूळ घातल्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.नक्षलवाद्यांना नको पर्यटन विकासकमलापूर येथील प्रसिद्ध हत्ती कॅम्पच्या परिसरातही नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत तोडफोड केली. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या भागात वनविभागाकडून १० हत्तींचे संगोपन केले जाते. याशिवाय नव्यानेच काही सिमेंटचे हत्ती, तथा पर्यटकांना माहिती देणारे फलक लावले होते. ते नक्षलवाद्यांनी तोडले. एकेकाळी कमलापूर हे नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते. पण आता कमलापूरवासियांनी हत्ती कॅम्पला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करून पर्यटकांसाठी सुविधा देण्याची मागणी केली. शासनाने ते काम सुरूही केले होते. परंतू नक्षल्यांच्या तोडफोडीमुळे बरेच नुकसान झाले. कोलामरका अभयारण्य व कमलापूर तलावाला पर्यटनस्थळ बनविण्याचा विरोध करा, असे आवाहन करणारी पत्रके नक्षल्यांनी तिथे टाकली आहेत. तसेच कमलापूर-दामरंचा मार्गावर झाडे तोडून रस्ता अडविला. तिथे बॅनरही लावल्याचे आढळले. 

नैराश्यातून नक्षलवाद्यांचे कृत्यअलिकडे झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नक्षलवाद्यांना घातपाती कारवाया करण्यात यश आले नाही. नागरिकांनी त्यांना न जुमानता भरघोस मतदान केले. अनेक नक्षली नेते आणि दलम सदस्य पोलिसांपुढे आत्मसमर्पण करत आहेत. यातून आलेल्या नैराश्यातून नक्षलवाद्यांनी हे कृत्य केले आहे. सामान्य आदिवासींचा रोजगार हिरावण्याचा प्रयत्न नक्षलवादी करत आहेत. त्यांचे हे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाही. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. - शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीMurderखूनPoliceपोलिस