शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शॉकींग! अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी भावानेचे केली २ सख्ख्या बहिणींची हत्या

By निखिल म्हात्रे | Updated: October 23, 2023 14:48 IST

गणेश मोहीते यांचे आपल्या दोन बहीणी व आई सोबत पटत नसे. यांच्यामध्ये सतत प्राॅपर्टी व अनुकंपाच्या नोकरीवरून वाद होत असत.

अलिबाग - अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी उच्च शिक्षित भावाने दोन सख्या बहिणींना विषारी औषध देऊन त्यांची हत्या केली. याप्रकरणात आरोपी गणेश यांनी पोलिसांना चुकीची माहीती देऊन पोलिसांनी चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी विविध युक्त्या लढवून घटनेची सविस्त माहीती घेऊन अखेर आरोपी गणेशच्या हाता बेड्या ठोकल्या.

गणेश मोहीते यांचे आपल्या दोन बहीणी व आई सोबत पटत नसे. यांच्यामध्ये सतत प्राॅपर्टी व अनुकंपाच्या नोकरीवरून वाद होत असत. या गोष्टीचा मनात राग धरून गणेश ने डोक शांत ठेऊन आपल्या दोन्ही बहीनींना फिल्मी स्टाईलने संपवायचे असे ठरविले. त्यानुसार मागील रविवारी पिण्यासाठी सुप बनवून त्यामध्ये विषारी औषध टाकून दोन्ही बहीणींना गणेशने संपविले. गणेशने गुगलच्या माध्यमातून सर्च करून कोणत्या विषारी औषधाला जेवणातून वा पाण्यातून देताना वास येणार नाही याची खात्री करण्यासाठी साधारणता 53 वेळा गुगल वरून माहीती घेतली असल्याचे तपासात समोर आले असल्याची माहीती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग तालक्यातील चौल येथील भोवाळे गावात जेवणातून विषबाधा झाली असल्याने सोनाली मोहिते (वय 34) व स्नेहल मोहिते (वय 30) या दोन बहिणींनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोनालीचा 16 आॅक्टोबर 2023 रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हि घटना रेवदंडा पोलिस ठाण्यात मिळाली असता आरोपी गणेश मोहिते याची फिर्याद घेवुन अकस्मात मृत्यू म्हणून दाखल करण्यात आला. सोनाली मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असता तिचा मृत्यु जेवणातील विषबाधेमुळे झाला असल्याचे समोर आले. तर दुसरी बहिण स्नेहल मोहिते (वय 30) हिला उलट्याचा त्रास होत असल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. स्नेहलला पुढील उपचारासाठी एम.जी.एम रुग्णालय पनवेल येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. स्नेहलचा मृत्युपूर्व जबाब नोंद केला आहे.

याबाबात स्नेहल व तिची आई जयमाला मोहिते यांनी सांगीतले गणेशने सोनाली व स्नेहाला सूप दिल्यानंतर पाणी पिण्यासाठी तांब्या भरून घराबाहेर ठेवला होता. त्यावेळी भावकीतील नातेवाईक त्यांना मारण्याच्या उद्देशाने विष टाकले असावे त्यामुळेच तिच्या मुली मयत झाल्या असाव्यात असा संशय व्यक्त केला होता. कारण जयमाला मोहीते व त्यांच्या नातेवाईकांमध्ये बरेच वर्षापासून मालमत्तेच्या वादातून भांडण सुरु होते. या गोष्टीचा मनात राग धरून माझ्या मुलींबर विष प्रयोग झाला असल्याचे सांगितले. मात्र घटनास्थळी जाऊन प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता प्राॅपर्टी व अनुकंपाच्या नोकरी वरूनच गणेश याने आपल्या बहीणींना संपविले असल्याचे समोर आले. तसेच आरोपी गणेश मोहीते याने आपणच दोन्ही बहीणींना संपविले असल्याचा कबुली जबाब हि दिला असल्याचे अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

या घटनेचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विशाल शिर्के, पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलिस हवालदार प्रतिक सावंत, यांनी केला आहे.

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस