आपल्या बाळावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून आई काहीही करण्यासाठी तयार असते. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, अशी म्हण प्रसिद्ध आहे. मात्र, आता आई-मुलीच्या नात्याला काळिमा लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणातील एका महिलेने आपल्याच पोटच्या मुलीवर बलात्कार घडवून, तिचे शरीर एक धावत्या ट्रक समोर फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
हरियाणाच्या कैथल जिल्ह्यात २१ मे रोजी एका १५ वर्षीय मुलीचा ट्रकला धडकून मृत्यू झाला होता. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकमुळे हा अपघात घडला असावा, असा सगळ्यांचाच समज झाला होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला. पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना म्हटले की, या मुलीवर आधी बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या झाली झाली.
आईनेच घडवली हत्या
२१ मे रोजी कैथल जिल्ह्यातील रादौरमधील धौलरा गावात रस्ता ओलांडताना १५ वर्षीय मुलीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, आय प्रकरणाचा तपास करत असताना मुलीच्या आईने केलेले काळे कृत्य सगळ्यांमोर आले. आईनेच आपल्या बॉयफ्रेंडकरवी १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करवला आणि नंतर तिची हत्या केली.
पतीसमोर दिली कबुली
मुलीची हत्या केल्यानंतर तो अपघात वाटावा म्हणून आईनेच तिचा देह रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकसमोर फेकला. ही घटना अपघातसदृश्य दिसावी म्हणून ट्रक चालकालाही या योजनेत सामील करून घेण्यात आले होते. मात्र, मुलीच्या श्राद्धा दिवशी महिलेने ही सगळी घटना आपल्या पतीसमोर कबूल केली. आपल्या मुलीचा मृत्यू अपघातात झाला नसून, आपणच बॉयफ्रेंडच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केला आणि या दरम्यान तिला दिल्या गेलेल्या गुंगीच्या औषधाची मात्रा अधिक झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं आईने कबूल केले.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
आपल्या पत्नीचा हा काळा कारनामा ऐकून पतीच्या पायाखालची जमीन सरकली. तर, पोलीस देखील सगळा प्रकार ऐकून हैराण झाले. मृत मुलीच्या पित्याने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीची आई, आईची मैत्रीण रेखा, बॉयफ्रेंड लाडी, त्याचा भाऊ रणजीत, शेजारी मिठ्ठू, डॉक्टर राजेश आणि ट्रक चालक रणजीत सरदार यांच्या विरोधात हत्या आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली.