ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलिया येथील कॅनबेरामधील न्यू साऊथ वेल्समध्ये धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशांची गच्च गर्दी असलेल्या बसमध्ये मागील सीटवर बसून आपल्या मित्राबरोबर सेक्स करणाऱ्या एका महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक कोर्टाने या महिलेविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. २९ मार्च रोजी वंडर आणि तिचा २४ वर्षीय मित्र रेयॉन जोन्स याला बसमध्ये सेक्स करताना प्रवाशांनी रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर प्रवाशांनी त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.महिलेच्या मित्राने मानसिक रुग्ण असल्याचे पुरावे कोर्टासमोर सादर केल्यानंतर त्याच्यावर कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अटक वॉरंट जारी झालेल्या महिलेचे नाव वंडर फ्रेंच (३१) असे आहे. वंडर ही तिच्या एका मित्रासोबत सार्वजनिक बसमधील मागच्या सीटवर सेक्स करत होती. या प्रकरणात २६ नोव्हेंबर रोजी न्यू कॅसल येथील कोर्टामध्ये सुनावणी होती. मात्र, सुनावणीसाठी महिला गैरहजर राहिली. यानंतर कोर्टाने तिच्यावरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. वंडरला न्यायालयामध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना दिली होती असा दावा तिच्या वकिलाने कोर्टात केला. पोलिसांनी वंडरने तिच्याविरोधातील कारवाईवर आक्षेप घेत त्यांच्याबरोबर हुज्जत घातल्याचा आरोप केला आहे. सुनावणीदरम्यान वंडरने तिच्याविरोधात सर्व आरोप स्वीकारले होते.
धक्कादायक! बसमध्ये सेक्स करणाऱ्या महिलेविरोधात अटक वॉरंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 20:45 IST
प्रवाशांनी त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.
धक्कादायक! बसमध्ये सेक्स करणाऱ्या महिलेविरोधात अटक वॉरंट
ठळक मुद्दे२९ मार्च रोजी वंडर आणि तिचा २४ वर्षीय मित्र रेयॉन जोन्स याला बसमध्ये सेक्स करताना प्रवाशांनी रंगेहाथ पकडलं होतं. सुनावणीदरम्यान वंडरने तिच्याविरोधात सर्व आरोप स्वीकारले होते.