शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दुसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, सात महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 18:53 IST

Lift Collapsed in Ambernath :इमारतीत सोमवारी काही महिला दुसऱ्या मजल्यावरील एका घरी डान्सच्या प्रॅक्टिससाठी गेल्या होत्या.

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये इमारतीची लिफ्ट दुसऱ्या माळ्यावरुन कोसळल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे . या घटनेत लिफ्टमधील सात महिला जखमी झाल्या असून दोघींच्या पायाला गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या निलयोग नगर परिसरात अनिता बिल्डिंग आहे. 

इमारतीत सोमवारी काही महिला दुसऱ्या मजल्यावरील एका घरी डान्सच्या प्रॅक्टिससाठी गेल्या होत्या. तिथून सायंकाळी पाचच्या दरम्यान परतत असताना लिफ्टमध्ये सात महिला एकत्रित गेल्या. यावेळी लिफ्ट अतिशय वेगात खाली येऊन कोसळली. कोसळणाऱ्या लिफ्टचा वेग इतका जास्त होता, की २ महिलांचे पाय जागीच मोडले. तर इतर महिलांनाही किरकोळ इजा झाल्या. या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर सोसायटीतल्या रहिवाशांनी तिथे धाव घेत त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याबाबत या इमारतीचे विकासक ज्ञानधर मिश्रा यांना विचारले असता, ही इमारत अतिशय नवीन असून लिफ्ट खराब होण्याचे काही कारण नव्हते. मात्र लिफ्टमध्ये प्रमाणापेक्षा जास्त महिला शिरल्याने लिफ्ट कोसळल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच याबाबत या महिलांना सोसायटीतील सदस्यांनी यापूर्वीही दोन वेळा समज दिली होती, मात्र तरीही क्षमतेपेक्षा जास्त महिला एकाच वेळी लिफ्टमध्ये गेल्याने हा अपघात झाल्याचे ते म्हणाले. तसेच ही इमारत आपण सोसायटीला हँडओव्हर केलेली असून सोसायटीकडून लिफ्टचे मेंटेनन्स सुद्धा केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या घटनेनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्या सुर्वे यांच्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले आहे. तर सुमन दास यांच्याही पायाचे आता ऑपरेशन करण्यात येणार आहे.

'' लिफ्ट खाली येत असताना अचानक लिफ्टचा वेब जास्त वाढला आणि ती खाली आदळली. क्षणभर आम्हाला काही कळले नाही. - विद्या सुर्वे, जखमी महिला

टॅग्स :ambernathअंबरनाथPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल