शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आईनेच स्वत:च्या १४ महिन्याच्या चिमुरडीची केली हत्या; झोपलेल्या अवस्थेत दाबले नाक, तोंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 21:25 IST

Crime news : निमिषा गोणे हिचा काही वर्षापूर्वी साकवाळ येथील निलेश गोणे याच्याशी विवाह झाला होता.

वास्को : आपल्या १४ महिन्यांच्या चिमुरडीचा नाक, तोंड दाबून आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना चिखली-वास्को येथे पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या हत्येनंतर आईने जुआरी पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘डीबीएल’ कंपनीच्या कामगारांनी तिला नदीच्या पाण्यातून बाहेर काढून गोमॅकॅात दाखल केले. निमिषा गोणे असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

निमिषा गोणे हिचा काही वर्षापूर्वी साकवाळ येथील निलेश गोणे याच्याशी विवाह झाला होता. निलेश हा जर्मनीत कामाला आहे. निमिषा काही काळापासून आपल्या मुलीसहीत जर्मनी येथे पती सोबत राहत होती. मात्र, एका आठवड्यापूर्वी निमिषा आपल्या १४ महिन्याच्या मुलीसह गोव्यात आल्यानंतर ती चिखली येथील आपल्या वडिलाच्या राहण्यासाठी आली होती. यानंतर शनिवारी (दि.६) पहाटे तिने आपल्या १४ महिन्यांच्या चिमुरडीचा नाक, तोंड दाबून आईनेच खून केला. यानंतर मुलीचा मृतदेह घरातच ठेवून ती शेजाऱ्यांची चारचाकी  घेऊन जुआरी पुलावर गेली. या पुलावरून तिने नदीत उडी मारली. यावेळी पूलावरून कोणीतरी नदीत उडी मारल्याचे तेथे असलेल्या ‘डीबीएल’ कंपनीच्या काही कामगारांना दिसून येताच त्यांनी त्वरित नदीतून तिला बाहेर काढले. त्यानंतर गोमॅकॉत उपचारासाठी पाठवून दिले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, पोलिसांनी त्वरित निमिषाच्या वडिलांच्या घरी संपर्क केला असता तेथे निमिषाची १४ महिन्याची मुलगी मृत अवस्थेत असल्याची त्यांना मिळाली. पोलिसांनी निमिषाच्या वडिलांच्या घरी धाव घेऊन चौकशीला सुरूवात केली असता निमिषाने तिच्या मुलीचा खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणात वास्को पोलिसांनी निमिषाविरुद्ध गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी सांगितले की, मुलीची हत्या केल्यानंतर निमिषाने घरातच आपल्या हाताची नस कापून आधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, मुलीची हत्या आणि स्वत: आत्महत्या करण्यासाठी निमिषाने का पाऊल उचलले, याचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. याबाबत अधिक तपास सुरू आहे. 

नैराश्यातून हत्या केल्याचा संशयएका आठवड्यापूर्वीच जर्मनीहून गोव्यात परतलेली निमिषा नैराश्यात होती, अशी माहिती निमिषाच्या नातेवाईकांकडून मिळते. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ह्याच कारणावरून चार दिवसापूर्वी ती एका डॉक्टरला भेटायला गेली होती. मात्र, याबाबत पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी निमिषा नैराश्यात होती की नाही, ते अजून उघड झाले नसल्याचे सांगितले. या प्रकरणाचा योग्यरित्या छडा लावण्यासाठी सर्व मार्गाने चौकशी केली जाणार असून निमिषाने तिच्या १४ महिन्याच्या मुलीची हत्या का केली आणि नंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला. याचे कारण लवकरच स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी