शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...गतीमंद युवतीवर ७० वर्षीय वृद्धाचा अत्याचार, गर्भपात करून अर्भक जाळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 20:21 IST

70 year old raped a mentally retarded girl : देविदास बोंबटकारने १९ वर्षीय युवतीवर सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत शारीरिक अत्याचार केला.

ठळक मुद्दे सात महिन्यापासून अत्याचार केल्याने युवतीला गर्भधारणा झाली. अर्भकाला आरोपी देविदास बोंबटकार व सुभाष मानसिंग सस्त्या या दोघांनी जाळून टाकले. 

जळगाव जामोद :   तालुक्यातील आदिवासी ग्राम इस्लामपूर शिवारात निवासाला असलेल्या गतीमंद युवतीवर सात महिन्यापासून अत्याचार केल्याने युवतीला गर्भधारणा झाली. त्यानंतर खाजगीरीत्या गर्भपात करून पाच ते सहा महिन्याच्या अर्भकाला जाळल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

वडोदा तालुका मुक्ताईनगर येथील देविदास ओंकार बोंबटकार (वय ७० ) याचे तालुक्यातील इस्लामपूर शिवारात शेत आहे. या शेताच्या बाजूला असलेल्या कुटुंबातील गतीमंद युवतीवर आरोपी देविदास बोंबटकारने १९ वर्षीय युवतीवर सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत शारीरिक अत्याचार केला .त्यामुळे पीडितेला गर्भधारणा झाली .त्यानंतर तिला खाजगीरित्या औषधी देऊन बळजबरीने तिचा गर्भपात करण्यात आला. नवजात अर्भकाला आरोपी देविदास बोंबटकार व सुभाष मानसिंग सस्त्या (वय ५०) राहणार इस्लामपूर या दोघांनी जाळून टाकले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन काकडे यांनी १८ जून रोजी रात्री उशिरा जळगाव जामोद पोलिसात तक्रार दिली. त्यावरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये कलम ३७६ (२) (एल)(एन) ३१५ व ३१८ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश आडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaon Jamodजळगाव जामोद