शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! घरात सापडले हाडांचे तब्बल ३ हजार ७८७ तुकडे, १७ हत्यांचा छडा लागण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 11:44 IST

Crime News: पुरावे लपवण्यासाठी सराईत गुन्हेगार अनेक क्लुप्त्या लढवतात. त्यातून त्यांचे गुन्हे काही दिवस लपवले जातात. मात्र अखेरीस हे गुन्हे उघडकीस येतात.

मेक्सिको सिटी - केलेला गुन्हा लपवण्यासाठी गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो. पुरावे लपवण्यासाठी सराईत गुन्हेगार अनेक क्लुप्त्या लढवतात. त्यातून त्यांचे गुन्हे काही दिवस लपवले जातात. मात्र अखेरीस हे गुन्हे उघडकीस येतात. (mexico serial killer ) असाच धक्कादायक प्रकार मेक्सिकोमध्ये उघडकीस आला आहे. मेक्सिकोमधील मेक्सिको सिटी शहराच्या बाहेरील भागामध्ये एका संशयित आरोपीच्या घरात तपास यंत्रणांनी केलेल्या खोदकामामधून आतापर्यंत हाडांचे तीन हजार ७८७ तुकडे सापडले आहेत. ही हाडे १७ वेगवेगळ्या लोकांची असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. (3 thousand 787 pieces of bones found in the house, 17 murders are likely to be found)

मेक्सिकोमधील तपासयंत्रणांच्या म्हणण्यानुसार हे खोदकाम अद्याप समाप्त झालेले नाही. हे खोदकाम १७ मेपासून सुरू आहे. तपासकर्त्यांना संशयित आरोपी राहत असलेल्या घरातील लादी फोडून आतमध्ये खोदकाम सुरू केले होते. आता या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्याचा तपास यंत्रणांचा विचार आहे. भंगाराने भरलेल्या या घरामध्ये अनेक वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या लोकांची ओळखपत्रे आणि अन्य सामान सापडले आहे. हे पुरावे या हत्या अनेक वर्षांपूर्वी झाल्या असाव्यात याकडे इशारा करत आहेत.  तपास यंत्रणांनी शनिवारी शनिवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, हाडांच्या तुकड्यांचे परीक्षण करण्याचे काम सुरू आहे. ज्यामध्ये सावधानपूर्वक या हाडांची स्वच्छता करण्यापासून ते हे अवयव शरीरातील कुठल्या भागाचे आहेत. यापर्यंतची माहिती घेतली जात आहे. यामाध्यमातून ही हाडे किती लोकांची आहेत याची माहिती घेतली जाणार आहे. दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार हे अवशेष १७ लोकांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.  दरम्यान, संशयित आरोपीची ओळख उघड न करण्याच्या देशाच्या कायद्यातील तरतुदीमुळे या प्रकरणात पकडण्यात आलेल्या ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे नाव उघड करण्यात आलेले नाही. या व्यक्तीविरोधात एका ३४ वर्षीय महिलेची हत्या केल्या प्रकरणी खटला सुरू आहे. 

एका पोलीस कमांडरने त्याची पत्नी बेप्ता झाल्यानंतर या ७२ वर्षींय व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता. तो या पोलीस कमांडरच्या पत्नीला वैयक्तिक दृष्ट्या ओळखत असे आणि त्याला या पोलीस कमांडरच्या पत्नीसोबत खरेदीसाठी जायचे होते. मात्र त्या दिवशी ही महिला घरी परतली नाही. त्यानंतर या पोलीस कमांडरने त्याच्या पत्नीच्या बेपत्ता होण्यामागे या व्यक्तीचा हात असल्याचे सांगितले. तपासामध्ये संबधित महिला ही या व्यक्तीच्या घरी जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. मात्र ही महिला बाहेर येताना दिसली नाही. नंतर या महिलेचे सामान संशयिताच्या घरातून जप्त करण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMexicoमेक्सिकोInternationalआंतरराष्ट्रीय