शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ३०० जणांना शेती उत्पादनात गुंतवणुकीच्या नावाने २६ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 09:30 IST

नितीन पार्टे, दीपक सुर्वे, अमोल जाधव, सचिन भिसे यांचा सहभाग असून, मुख्य आरोपी पार्टेसह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: शेती उत्पादनात गुंतवणूक करून महिना ५ टक्के नफा आणि ११ महिन्यांनी मूळ रक्कम परत मिळवा, अशी जाहिरात करून रुद्रा ट्रेडर्स कंपनीने एजंटद्वारे सुमारे ३०० लोकांची अंदाजे २६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तक्रारअर्जाची छाननी करून संबंधित आरोपींविरोधात एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात नितीन पार्टे, दीपक सुर्वे, अमोल जाधव, सचिन भिसे यांचा सहभाग असून, मुख्य आरोपी पार्टेसह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे.

वाशीतील आलिशान व्यावसायिक संकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गावरील सतरा प्लाझात कंपनीचे कार्यालय आहे. मसाला आणि सुका मेवा याचबरोबर थेट शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करून निर्यात करण्याचे काम ही कंपनी करत असल्याचे भासवले जात होते. यातील आरोपी पार्टे हा  लक्ष्मीप्रसाद को-ऑप. क्रेडिट सोसायटी पतसंस्थेचा संचालकही आहे.

या दोन्हींच्या जीवावर पार्टे याने ३०० गुंतवणूकदारांची फसवणूक केली. यातील व्यवहार पारदर्शक असल्याचे भासवण्यासाठी लक्ष्मी प्रसाद को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे धनादेश, फिक्स डिपॉझिट बॉण्ड गुंतवणूकदारांना मार्च २०२२ पासून दिले जात होते. मात्र, परताव्याचे पैसे मिळत नाहीत आणि ज्यांनी पैसे घेतले त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने महेंद्र डेरे या गुंतवणूकदाराने एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याची तत्काळ दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक अशोक दामले, पोलिस उपनिरीक्षक नीलेश महाडिक यांचे पथक नेमले. या पथकाने आरोपींना गाफील ठेवून तपास सुरू केला. यात सर्व प्रकाराची खात्री पटल्यावर गुरुवारी रात्री आरोपींना अटक केली.

घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता

या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून, गुंतवणूकदारांनी स्वत:हून एपीएमसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील उरण येथे काही महिन्यांपूर्वी कोट्यवधींचा चिटफंड घोटाळा समोर आला होता. या प्रकरणी स्वतः पोलिसांनी पुढाकार घेत कारवाई केली व आरोपींना गजाआड केले. आता अशाच प्रकारचा चिटफंड घोटाळा समोर आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी