शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रक्तदंतिका माता मंदिरात 13 लाखांची लूट; सोन्या-चांदीच्या वस्तुंवर मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 11:48 IST

दरोडेखोरांनी मंदिरात झोपलेले दोन पुजारी व एका सहाय्यकाला बंधक बनवून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील हिंदोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सथूर येथील रक्तदंतिका माता मंदिरात धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी मंदिरात झोपलेले दोन पुजारी व एका सहाय्यकाला बंधक बनवून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने, मंगळसूत्र व इतर मौल्यवान वस्तू लुटून दरोडेखोरांनी पळ काढला. या घटनेत एक पुजारी गंभीर जखमी झाला असून त्याला कोटा येथे रेफर करण्यात आले आहे. 

दोन जणांना बुंदी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काल रात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान बुंदी येथील सथूर गावात असलेल्या रक्तदंतिका माता मंदिरात दरोडेखोर लुटण्याच्या उद्देशाने आले. दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला आणि झोपलेल्या पुजारी आणि सहायकावर हल्ला केला.

सथूर माता मंदिराचे पुजारी अजय ब्रह्म भाट यांनी सांगितलं की, रात्री 12 वाजल्यानंतर मंदिरात सेवक राम अवतार उर्फ ​​पप्पू, नवरत्न, राजू प्रजापत रा. सथूर हे झोपले होते. दरम्यान, 6 ते 7 दरोडेखोर मंदिरात घुसले. त्यांनी पुजाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. राजू प्रजापत यांच्या डोक्याला व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. यानंतर, पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना बुंदीला पाठवण्यात आले, तेथून एकाला कोटा येथे रेफर करण्यात आले. दोघांना बुंदीमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुजारी अजय ब्रह्मा भाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी मंदिरातून 7 तोळे सोने आणि 12 किलो चांदी चोरून नेली. ज्यामध्ये चांदीचे छत्र, सोन्याची नथ, मंगळसूत्र, मुकुट इ. चोरीला गेलेल्या मालाची किंमत सुमारे 13 लाख रुपये आहेत.

मंदिरात चोरीच्या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे मंदिर देवस्थान विभागाच्या अंतर्गत येतं. मंदिरात चोख सुरक्षा व्यवस्था नव्हती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांअभावी दरोडेखोरांबाबत फारशी माहिती मिळू शकली नाही. घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी