शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! १० हजार दिले नाही; मोठ्या भावाने छोट्याच्या डोक्यात हाणली सळई

By नरेश रहिले | Updated: November 20, 2023 18:18 IST

तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्दमध्ये घडली घटना

नरेश रहिले, गोंदिया: एक दिवसापूर्वी दहा हजार रुपये मोठ्या भावाने लहान भावाला मागितले; परंतु त्याने आज पैसे नाहीत उद्या देईल म्हणणाऱ्या लहान भावाला यमसदनी पाठविण्यासाठी मद्यपी असलेल्या मोठ्या भावाने लोखंडी सळईने झोपेतच असलेल्या लहान भावाच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता चांदोरी खुर्द येथे घडली.

तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील मोरगेंद्र रतिराम बिसेन (२३) हा तरुण १८ नोव्हेंबर रोजी काका राजेश्वर बिसेन यांच्या घरी पाहुणे आल्यामुळे मोरगेंद्र रतिराम बिसेन (२३) हा काकाकडे गेला होता; परंतु मद्याच्या धुंदीत असलेला त्याचा मोठा भाऊ धर्मराज बिसेन हा त्या ठिकाणी आला. लहान भावाला १० हजार रुपये आताच दे असा आग्रह केला; परंतु माझ्याकडे आता पैसे नाहीत, मी उद्या देईन असे म्हटल्यावर आरोपीने त्याला मारण्याची धमकी देत तो निघून गेला. मोरगेंद्र हा काका घरीच झोपला. दुसऱ्या दिवशी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता सगळे लोक झोपेत असताना आरोपी धर्मराज बिसेन हा लोखंडी सळई घेऊन त्या ठिकाणी आला. मोरगेंद्र यांच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यावर मोरगेंद्र जोराने ओरडले असता मनीष राजेश्वर बिसेन, रजनी राजेश्वर बिसेन, यशोदा राजाराम बिसेन यांना तत्काळ मोरगेंद्रच्या दिशेने धाव घेतली. आरोपी धर्मराज बिसेनला थांबविले. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार बिल्लोरे करीत आहेत.

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारी