शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Pornography Case : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला जामीन मंजूर; १९ जुलैला झाली होती अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 18:27 IST

Porn Films Case: Businessman Raj Kundra Granted Bail : आज अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी न्यायालयाकडून राज कुंद्राला जामीन मिळाला आहे.

ठळक मुद्देराज कुंद्राची पॉर्नोग्राफी प्रकरणात 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे

मुंबई कोर्टाने उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची पॉर्नोग्राफी प्रकरणात 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. आज अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी न्यायालयाकडूनराज कुंद्राला जामीन मिळाला आहे. राज कुंद्रा 2 महिने तुरुंगात होता. उद्या १०.३० वाजताच्या सुमारास कोर्टातील कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर राज कुंद्राची जेलमधून सुटका करण्यात येणार आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा बराच काळ तुरुंगात होता. राजविरोधात अश्लील चित्रपट बनवणे आणि ते अॅपवर सादर करणे हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अलीकडेच मुंबई पोलिसांनी सुमारे १५०० पानांचे आरोपपत्रही दाखल केले होते. पण आता अखेर जामीन मिळाल्याने राज कुंद्राने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, १३ जणांविरुद्ध ४ हजार ९९६ पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मालमत्ता कक्षाकडून अधिक तपास सुरू आहे. दोषारोप पत्रात, पॉर्नोग्राफी प्रकरणाचा कुंद्राच मुख्य सूत्रधार असल्याबाबतचा ठपका ठेवण्यात आला आहे. कुंद्राने २०१९ मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली. 

 राज कुंद्रासाठी शिल्पाचं वैष्णो देवीला साकडं

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दोषी ठरवण्यात आल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, शिल्पा या सगळ्या समस्यांना धीराने सामोरं जात असून प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या सांभाळत आहे. नुकतंच शिल्पाने मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा केला. त्यानंतर आता तिने वैष्णो देवीचं दर्शन घेतलं आहे. सध्या सोशल मीडियावर शिल्पाचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राShilpa Shettyशिल्पा शेट्टीCourtन्यायालय