शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शीना बोरा जिवंत नाही, सीबीआयकडे पुरावे; आराेपी इंद्राणी मुखर्जीचा दावा फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 06:09 IST

शीना बोरा जिवंत असून, तिचा शोध घेण्यात यावा, असा अर्ज शीनाची आई व शीनाच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने विशेष सीबीआय न्यायालयात केला हो

मुंबई : शीना बोराचा खरोखरच मृत्यू झाला आहे, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत, असे सीबीआयने विशेष न्यायालयाला शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा दावा फेटाळताना सांगितले.शीना बोरा जिवंत असून, तिचा शोध घेण्यात यावा, असा अर्ज शीनाची आई व शीनाच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने विशेष सीबीआय न्यायालयात केला होता. या अर्जावर सीबीआयने उत्तर दाखल केले. 

इंद्राणी मुखर्जीने केलेल्या अर्जानुसार, एका महिला पोलीस निरीक्षकाने शीना हिला काही महिन्यांपूर्वी श्रीनगरमध्ये पाहिले आणि तसा जबाब ती पोलिसांकडे देण्यास तयार आहे. इंद्राणीने सीबीआयच्या सहसंचालकांना २७ नोव्हेंबर २०२१ रोजी  लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आणि आता माझी सहकैदी मुंबई पोलीस निरीक्षक आशा कोर्के ही गेल्यावर्षी जून महिन्यात शीना बोराला श्रीनगर येथे डल लेकजवळ भेटली होती. 

तिच्या या पत्रावर सीबीआय सहसंचालकांनी काहीही उत्तर न दिल्याने तिने न्यायालयात अर्ज केला. शीनाने न्यायालयात केलेल्या अर्जानुसार, कोर्के शीनाला अचानक भेटली. शीनाला पाहून कोर्केने तिला ती जिवंत असल्याने सगळ्यांसमोर येऊन तिच्या आईला मदत करण्याची सूचना केली.  तिच्याच हत्येप्रकरणी तिची आई कारागृहात असल्याने तिला सोडविण्याचा सल्ला कोेर्केने शीनाला दिला. मात्र, तिने तो सल्ला नाकारला. मला पुन्हा जुने आयुष्य जगायचे नाही, असे म्हणून ती एका पुरुषाच्या बाईकवरून निघून गेली.सीबीआयच्या संहसंचालकांना पत्रसीबीआयच्या सहसंचालकांना २७ नोव्हेंबर २०२१ रोजी  लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आणि आता माझी सहकैदी मुंबई पोलीस निरीक्षक आशा कोर्के ही गेल्यावर्षी जून महिन्यात शीना बोराला श्रीनगर येथे डल लेकजवळ भेटली होती. 

तिच्या या पत्रावर सीबीआय सहसंचालकांनी काहीही उत्तर न दिल्याने तिने न्यायालयात अर्ज केला. शीनाने न्यायालयात केलेल्या अर्जानुसार, कोर्के शीनाला अचानक भेटली. शीनाला पाहून कोर्केने तिला ती जिवंत असल्याने सगळ्यांसमोर येऊन तिच्या आईला मदत करण्याची सूचना केली. तिच्याच हत्येप्रकरणी तिची आई कारागृहात असल्याने तिला सोडविण्याचा सल्ला कोेर्केने शीनाला दिला. मात्र, तिने तो सल्ला नाकारला. मला पुन्हा जुने आयुष्य जगायचे नाही, असे म्हणून ती एका पुरुषाच्या बाईकवरून निघून गेली. 

शीनाच्या हत्येनंतर तीन वर्षांनी म्हणजेच २०१५मध्ये तिच्या हत्येची बाब उजेडात आली. त्यानंतर सर्वात आधी शीनाची आई इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली. त्यानंतर तिच्या दोन पतींना अटक करण्यात आली.

सापळ्याचे डीएनए मॅच तपास यंत्रणेने जमवलेल्या पुराव्यांवरून शीना बोराचा मृत्यू झाल्याचेच सिद्ध होते. रायगडच्या जंगलातून सापडलेल्या सापळ्याचे डीएनए मॅच झाले आहेत. त्यावरून शीना बोराचा मृत्यू २०१२मध्ये झाल्याचे सिद्ध होते, असे सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात म्हणत सीबीआयने इंद्राणीचा अर्ज फेटाळण्याची विनंती केली.  

टॅग्स :Sheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरणIndrani Mukherjeeइंद्राणी मुखर्जीCBIगुन्हा अन्वेषण विभाग