शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये राहतेय; इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 06:33 IST

इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला दिलेल्या पत्रात हा दावा केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

मुंबई : शीना बाेरा जिंवत असून ती काश्मीरमध्ये आहे, असा खळबळजनक दावा शीनाच्या हत्येत आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला दिलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. कारागृहात नुकतीच आपली एका महिलेसोबत भेट झाली असून, ही महिला काश्मीरमध्ये शीना बोराला पाहिल्याचे सांगते, तिथे तिचा शोध  घ्यावा असे तिने पत्रात म्हटले आहे. 

या पत्रासोबतच इंद्राणीने विशेष सीबीआय न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. शीना बोरा हत्या प्रकरणात २०१५ पासून इंद्राणी भायखळा कारागृहात आहे. इंद्राणीने आपल्या पत्रात सीबीआयला काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घेण्याची विनंती केली आहे. ती महिला कोण होती? तिने नेमकी काय माहिती दिली? आदीबाबत सीबीआय तपास करणार आहे. काय आहे शीना बोरा हत्याकांड ?इंद्राणी मुखर्जीचा चालक श्यामवर राय याच्याकडे पिस्तुल आढळल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्याला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान त्याने आणखी एका प्रकरणात सहभागी असल्याचे सांगत हत्याकांडाचा साक्षीदार झाला. इंद्राणी मुखर्जीने २०१२मध्ये गळा दाबून शीना बोराची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते.शीना इंद्राणीची मुलगी होती आणि मुंबईत घर मिळविण्यासाठी ब्लॅकमेल करत होती, असे  तपासात समोर आले. शीना बोरा गायब झाल्यानंतर राहुल मुखर्जी (पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा) याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. राहुल आणि शीना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण राहुलला शीना पुढील आयुष्यासाठी विदेशात निघून गेल्याचे सांगण्यात आले.

  • २०१५मध्ये हे प्रकरण उघडकीस आले. इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठले  होते. 
  • पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटविल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. 
  • या कटात सहभागी असल्याच्या आरोपातून  सीबीआयने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. गेल्यावर्षी त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता.
टॅग्स :Indrani Mukherjeeइंद्राणी मुखर्जीSheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरण