शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

‘ती’ गाडीखाली अडकल्याचे होते माहीत; आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शाेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 07:50 IST

विशेष पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १८ पथके या प्रकरणाचा तपास करत असून, सर्व पैलू तपासले जात आहेत.

नवी दिल्ली : ‘हिट अँड रन’ प्रकरणातील पाच आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन फरारी आरोपींचा शोध सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. नवीन आरोपींपैकी एक आरोपीचा भाऊ अमित आहे. तो गाडी चालवत होता. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही. त्याला वाचवण्यासाठीच दीपकचे नाव पुढे करण्यात आले. मुलगी गाडीखाली अडकल्याची माहिती आरोपीला होती. यानंतरही तो गाडी चालवत राहिला, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले. 

विशेष पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १८ पथके या प्रकरणाचा तपास करत असून, सर्व पैलू तपासले जात आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आणि कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे आणखी दोन जणांचा सहभाग समोर आला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आशुतोष आणि अंकुश अशी ओळख असलेले दोघे आरोपी इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, असे त्यांनी सांगितले. अंजलीचा मोबाइल अद्याप सापडलेला नाही. याशिवाय अंजली आणि आरोपींची ओळख नव्हती, असेही पोलिसांनी सांगितले. 

अंजलीच्या आईचा निधीवर संशय, पोलिसांवर आरोप- मृत अंजलीच्या आईने बुधवारी रात्री मुलगी अंजलीच्या हत्येत निधीचाही हात असू शकतो, असा संशय व्यक्त केला. ‘मी निधीला ओळखत नाही. - मी तिला कधीच पाहिले नाही. अंजलीने मद्यपान केलेले नव्हते. ती कधीच मद्यधुंद अवस्थेत घरी आली नाही. - पोलिसांनी अंजलीच्या भावाला मध्यरात्री उचलले. मुलीला बदनाम करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी