शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उकळत्या तेलात हात पोळून चारित्र्य सिद्ध केले; पण दुर्दैव, महिलेवर पोलिसाचाही लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 21:34 IST

Crime News : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. पारधी समाजातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला.

ठळक मुद्देपीडित महिलेवर गावातील एका व्यक्तीसह पोलीस कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडिता आणि तिच्या पतीने केला आहे.

पारधी समाजातील एका महिलेला आपण चारित्र्य संपन्न असल्याचे सिद्ध करण्यासाठी अनोखी परिसखा द्यावी लागली. तिने उकळत्या तेलात हात घातला होता. जात पंचायतीच्या या अमानुष न्यायनिवाड्याचा छळाचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात घडला आहे. मात्र आता या प्रकराला एक गंभीर वळण लागलं आहे. पीडित महिलेवर गावातील एका व्यक्तीसह पोलीस कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडिता आणि तिच्या पतीने केला आहे.

पीडित महिला आणि तिचा पती आता मीडियासमोर आले आहेत. गावातील एक व्यक्ती आणि परंडा पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याने संबंधित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवऱ्याला तुरुंगात डामण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती टीव्ही ९ने दिली आहे. 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. पारधी समाजातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशावेळी या समाजातील जायपंचायतीने महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली. संबंधित महिलेच्या पतीनं दगडांची चूल मांडली. चुलीत आग लावून कढई ठेवली आणि कढईत तेल ओतलं. ते उकळल्यावर नवऱ्याने त्या कढईत ५ रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास महिलेला सांगण्यात आलं.

 

या अमानुष परीक्षेचा परिणाम त्या महिलेला माहिती होता. ती तेलात हात घालण्यास नकार देत होती. पण आपल्या पत्नीचं चारित्र्य तपासण्यासाठी तिच्या पतीनं तेलात हात घालण्यासाठी जोरजबदस्ती केली. उकळत्या तेलातील नाणं बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही तर तिचं चारित्र्य शुद्ध! जर तिचा हात भाजला तर तिला चारित्र्यहीन असल्याचं जाहीर केलं जातं. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशी अमानवी शिक्षा देणाऱ्यांवर जात पंचायत विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली आहे. मात्र, आता या प्रकाराला गंभीर वळण लागल्याने उस्मानाबाद पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात, याकडे लक्ष आहे.

टॅग्स :PoliceपोलिसUsmanabad policeउस्मानाबाद पोलीसWomenमहिलाSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ