शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

'तिने केली विनवणी, मात्र नराधमांनी नाही जुमानले'; मित्राला मारहाण करून तरुणीवर दोघांचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 18:43 IST

तरुणीच्या मित्राला मारहाण करून आरोपींनी तरुणीला जबरदस्ती ओढत नेले व अत्याचार केला.

ठळक मुद्दे भांगसीमाता गडाच्या पायथ्याशी गप्पा मारत बसलेले असताना घडली घटना दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत

दौलताबाद : मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका  वीसवर्षीय तरुणीच्या मित्राला मारहाण करून तरुणीवर अत्याचार केला. ही घटना औरंगाबाद शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर असलेल्या भांगसीमाता गडाच्या जंगलात मंगळवारी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी एकाही आरोपीला ताब्यात घेतले नव्हते. 

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे राहणारी २० वर्षीय तरुणी मंगळवारी (दि.४) दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास मित्रासोबत दुचाकीवर भांगसीमाता गडावर फिरायला गेली होती. दरम्यान, गडाच्या बाजूला दोघे बसून गप्पा मारीत असताना संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले व दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तरुणीसोबत असलेल्या मित्राला जास्त मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. 

त्यानंतर तरुणीला गडाच्या बाजूला असलेल्या एका खोल खड्ड्यात घेऊन गेले. त्या नराधामांना  तरुणी वारंवार सोडून द्या, अशी विनवणी करीत होती; परंतु नराधम तिचे तोंड दाबून तिला घेऊन गेले. दोघांपैकी एक खड्ड्याच्या वर थांबून निगराणी करीत होता. दुसऱ्याने त्या पीडितेला पुन्हा मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केला, तसेच या घटनेची कुठे वाच्यता केल्यास तुला जिवे मारून टाकू, अशी धमकी देत आरोपी घटनास्थळाहून पसार झाले. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोनि. राजश्री आडे, पोलीस उपनिरीक्षक शेख आरीफ हे पुढील तपास करीत आहेत.

तरुणाने केली आरडाओरड  तरुणीच्या मित्राला मारहाण करून आरोपींनी तरुणीला जबरदस्ती ओढत नेले व अत्याचार केला. तरुणीला कोठे नेले याबाबत तिच्या मित्राला माहिती नव्हती. यामुळे त्याने आरडाओरड केली. यानंतर परिसरात असलेल्या काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीला व तिच्या मित्राला ठाण्यात नेऊन अधिक चौकशी केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद