शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शारदा घोटाळा : मुख्य आरोपी सुदिप्ता सेनने जेलमधून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

By पूनम अपराज | Updated: December 6, 2020 20:11 IST

Sharda Scam : २०१३च्या घोटाळ्याच्या खटल्याचा सामना करत सेन याने आपल्या पत्रात सीबीआय आणि राज्य पोलिसांकडून त्याच्याकडून पैसे घेणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देप्रक्रियेचा एक भाग म्हणून एडीजी (सुधार गृह) पीयूष पांडे यांना हे पत्र सादर करण्यात आले आहे, असे जेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हजारो कोटींच्या शारदा  घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुदिप्ता सेनने पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिले आहे. सेन याने पत्रात काही प्रमुख राजकारण्यांसह अनेक प्रभावशाली व्यक्तींनी त्याच्याकडून आर्थिक फायदा घेतल्याचा आरोप केला. २०१३च्या घोटाळ्याच्या खटल्याचा सामना करत सेन याने आपल्या पत्रात सीबीआय आणि राज्य पोलिसांकडून त्याच्याकडून पैसे घेणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याचे आवाहन केले.पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी विनंती करणारी याचिका सेन याने १ डिसेंबर रोजी केली होती. सेन याने पत्रात म्हटले आहे की, 'आदरणीय सर आणि आदरणीय मॅडम, मी शारदा कंपनी समूहाचे मालक आणि संचालक सुदिप्ता सेन, मला सांगायचे आहे की, बऱ्याच प्रभावशाली लोकांनी माझ्याकडून आर्थिक लाभ घेतला आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या यादीमध्ये माकप, भाजप, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या अनेक राजकारण्यांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात आवश्यक ती कारवाई करावी अशी मी सीबीआय आणि राज्य पोलिसांना विनंती करतो.सध्या येथे राष्ट्रपतींच्या सुधारगृहात बंदिस्त असलेले सेन यांनी पत्रात म्हटले आहे की,यापूर्वी त्यांनी सीबीआय आणि पश्चिम बंगाल पोलिसांना याप्रकरणी माहिती दिली होती, परंतु कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मी सीबीआयला याबद्दल सर्व काही सांगितले आहे. उच्च नैतिकतेबद्दल बोलणाऱ्यांनी गरीब लोकांची खरोखरच फसवणूक केली हे पाहून मला खूप वेदना होत आहे. मी सीबीआय आणि राज्य पोलिसांना या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची विनंती करतो.प्रक्रियेचा एक भाग म्हणून एडीजी (सुधार गृह) पीयूष पांडे यांना हे पत्र सादर करण्यात आले आहे, असे जेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पांडे यांनी मात्र याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. दुसरीकडे माकपचे नेते सुजन चक्रवर्ती यांनी सेन याच्या आरोपांना कचरा असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसनेही पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या राज्य नेतृत्वानेही संपूर्ण प्रकरण 'गलिच्छ राजकारण' असे घोषित केले, परंतु सीबीआय या प्रकरणातील सत्यता समोर आणेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :jailतुरुंगNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीprime ministerपंतप्रधानChief Ministerमुख्यमंत्रीwest bengalपश्चिम बंगाल