शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोणालाच थांगपत्ता लागू दिला नाही, पाच महिने विद्यार्थिनी बनली, महिला पोलिसाने लावला रॅगिंगचा छडा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 05:51 IST

मेडिकल कॉलेजमधील प्रकरणात ११ पैकी नऊ जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कइंदूर : रॅगिंगच्या एका ऑनलाइन तक्रारीची दखल घेत इंदूर पोलिसांनी एका महिला पोलिसाला विद्यार्थिनी बनविले आणि कॉलेजमध्ये पाठविले. जवळपास पाच महिने ही महिला पोलिस विद्यार्थिनी बनून मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग करणाऱ्यांचा शोध घेत होती. अखेर ११ जणांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे, तर काही आरोपी विद्यार्थी फरार आहेत. 

पोलिस आयुक्त हरिनारायण चारी मिश्र यांनी सांगितले की, जुलैमध्ये एमजीएममध्ये विद्यार्थिनींनी गोपनीय पद्धतीने ॲण्टिरॅगिंग कमिटीकडे ऑनलाइन तक्रार केली होती. त्यानंतर पूर्ण प्रकरणात एमजीएम मेडिकल कॉलेज व्यवस्थापनाकडून संयोगितागंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांकडे ना तक्रारदाराचे नाव होते, ना आरोपींची ओळख. 

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एका पथक तयार करत यात एक महिला पोलिस शालिनी चौहान (वय २४) यांना विद्यार्थिनी बनवून वेशभूषेत कॉलेजमध्ये पोहोचविले. ही महिला पोलिस विद्यार्थिनी बनून तासन तास कॉलेजच्या कँटीनमध्ये बसून राहत होती. हळूहळू तिने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी मैत्री केली. त्यानंतर तिने रॅगिंगबद्दल बोलणे सुरू केले. यातून तिला कॉलेजमध्ये झालेल्या रॅगिंगची माहिती मिळत गेली. नंतर एका-एका आरोपीची ओळख निश्चित करून ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत राहिली. 

महिला पोलिस शालिनी म्हणतात...पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना अटक केली आहे, तर काही जण फरार आहेत. शालिनी चौहान यांच्या कामाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे. शालिनी यांनी सांगितले की, वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांची पोलिस खात्यात नियुक्ती झाली. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी माझी निवड केली तेव्हा ठरविले की, पूर्ण क्षमतेने आरोपींना शोधून काढण्यासाठी काम करू. आपली ओळख लपवीत मी विद्यार्थिनी झाले. वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस ठाण्याचे प्रभारी यांच्या निर्देशावरून काम करत राहिले. या प्रकरणाचा छडा लावून आपण आपले कर्तव्य पूर्ण केल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Medicalवैद्यकीय