शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखच्या बंगल्यावर धाड टाकलेली नाही; समीर वानखेडेंनी सांगितलं 'मन्नत'वर जाण्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 18:40 IST

Aryan Khan And Sameer Wankhede : आज या प्रकरणी आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी मन्नत या बंगल्यावर छापा टाकला, अशी माहिती माध्यमांत पसरली होती.

ठळक मुद्देएनसीबीकडून समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण देत शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं होतं, अशी माहिती दिली आहे. 

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीच्या अटकेत असलेल्या आर्यन खानसह आठ जणांच्या न्यायालयीन कोठडीत सत्र न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. आज या प्रकरणी आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी मन्नत या बंगल्यावर छापा टाकला, अशी माहिती माध्यमांत पसरली होती. परंतु, एनसीबीकडून समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण देत शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं होतं, अशी माहिती दिली आहे. 

 

आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुपरस्टार शाहरुख खानने आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची १० मिनिटं भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून अभिनेत्री  अनन्या पांडेच्या घरीही शोधमोहीम राबवण्यात आली. तसेच तिला समन्स बजावून दुपारी 2 वाजता अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्यासह एनसीबी कार्यालयात पोहचली.  

दरम्यान एनसीबीच्या या कारवाईबाबत प्रसिद्धी माध्यमांमध्ये शाहरुखच्या मन्नत या बंगल्यावर छापा टाकल्याची माहिती प्रसारित झाली होती. मात्र, कोणताही छापा टाकला नसून केवळ आर्यन खानसंबंधित काही कागदपत्रं गोळा करण्यासाठी मन्नतवर एनसीबीचे पथक गेल्याची माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली. 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थraidधाडShahrukh Khanशाहरुख खान