शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

सकाळी जिथं शिकायची, संध्याकाळी तिथेच व्हायचा बलात्कार; गँगरेपनं शाळा हादरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 14:58 IST

सध्या पोलीस या प्रकाराचा तपास करत आहेत. ज्यानं हे वाईट कृत्य केलंय त्यांना सोडणार नाही असं पोलिसांनी म्हटलं.

चित्रकूट – रात्रीच्या वेळी आई वडील त्यांच्या १६ वर्षीय मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले. मुलीचा अवस्था बिकट होती. तिची बोलण्याचीही मानसिकता नव्हती. यूपीच्या चित्रकूट जिल्ह्यातील हा प्रकार आहे. ही १० वीच्या वर्गात शिकणारी मुलगी होती. पीडित मुलीच्या आईनं पोलिसांना जे सांगितले ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. संध्याकाळी आई किचनमध्ये जेवण बनवत होती तेव्हा मुलीच्या रडण्याचा आवाज आला. आई धावत तिच्या रुममध्ये गेली तेव्हा ती बेडखाली पडून विव्हळत होती. कदाचित तिला पीरिड्सचा त्रास होत असेल असं आईला वाटले. परंतु आईनं तिला विचारल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला तो ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली.

टीचरपासून प्रिसिंपल हैवान

पीडित मुलीनं सांगितले की, शाळा सुटल्यानंतर शिक्षक इरशाद सर एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्याने मला थांबवून ठेवतात. माझ्यासोबत अश्लिल चाळे करतात. २ महिने त्यांनी तेच केले. त्यानंतर मोइन सर, आदित्य सरांनीही तेच सुरू केले. शाळेतील प्रिसिंपल सह ४ जणांनी मुलीवर अत्याचार केला असा आरोप आईने केला. सध्या पोलीस या प्रकाराचा तपास करत आहेत. ज्यानं हे वाईट कृत्य केलंय त्यांना सोडणार नाही असं पोलिसांनी म्हटलं. पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली आणि मुलीला मेडिकलसाठी पाठवले.

जबाबात म्हटलंय की, हा प्रकार जुलै २०२२ चा आहे. जेव्हा कुटुंबाने मुलीचे एडमिशन ९ वीच्या वर्गात केले होते. २ महिने सर्वकाही ठीक होते. त्यानंतर विज्ञानाचे शिक्षक इरशादने मुलीशी जवळीक साधली. प्रोजेक्ट वर्क पूर्ण करण्यासाठी तिला थांबवून ठेवायचे. ज्याठिकाणी सीसीटीव्ही नाही, जास्त कुणी येत नाही त्या क्लासरुममध्ये घेऊन जायचे. शिक्षकांनी मुलीचे व्हिडिओही काढले होते. जर कुणाला या प्रकाराची वाच्यता केली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मोइन सर, आदित्य सर आणि प्रिसिंपल यांनीही मुलीसोबत हे कृत्य केले. मुलीने विरोध केल्यावर शाळेतून तिला काढून टाकण्याची धमकी दिली.

इतकेच नाही तर मुलगी गर्भवती राहू नये यासाठी तिला गर्भनिरोधक गोळ्या खायला द्यायचे. या गोळ्यांचे प्रमाण वाढल्याने मुलीची तब्येत ढासळली, मुलीच्या पोटात दुखू लागले. अचानक वेदना वाढली तेव्हा मुलगी रडायला लागली. त्यानंतर तिने हा प्रकार आईला सांगितला. मेडिकल तपासात मुलीच्या पोटात सूज असल्याचे दिसले. अतिप्रमाणात गर्भनिरोधक गोळ्या खाऊन तिला त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकाराचा तपास करून गुन्हा दाखल करू असं पोलीस म्हणाले. परंतु जर सर्व आरोपी पकडले नाही तर आम्ही कुटुंबासह आत्महत्या करू असं पीडितांनी सांगितले. या प्रकरणात प्रिसिंपल समोर आले आणि त्यांनी माझी नार्को टेस्ट करा अशी मागणी केली. मुलीच्या क्लासरुममधील इतर मुलींनीही अशी कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले. सध्या पोलीस संपूर्ण तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी