शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा लैंगीक छळ; आराेपीस आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 12:27 IST

Crime News : स्वप्नील विनाेद डाेंगरे याने गावातील एका अल्पवयीन मुलीचा ती मुलगी दुसऱ्या वर्गात असतानापासून लैंगीक छळ केला़.

अकाेला : बार्शिटाकळी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा लैंगीक छळ करणाऱ्या आराेपीस पाॅस्काे न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही़ डी़ पींपळकर यांच्या न्यायालयाने आजन्म कारावास जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ यासाेबतच आराेपीस तब्बल तीन लाख ५० हजार रुपयांचा दंड ठाेठावला असून दंड भरल्यास अतीरीक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे़.  बार्शिटाकळी तालुक्यातील रहिवासी असलेला स्वप्नील विनाेद डाेंगरे वय २३ वर्ष याच गावातील एका अल्पवयीन मुलीचा ती मुलगी दुसऱ्या वर्गात असतांनापासून लैंगीक छळ केला़. मात्र या संदर्भातील ज्ञान या अल्पवयीन मुलीला नसल्याने तीने याची वाच्यता कुठेही केली नाही़. माच १० जुलै २०१९ राेजी तीच्या शाळेतील लैंगीक अत्याचार या विषयावर समुपदेशन झाल्यानंतर तीला तीच्यावर अशाच प्रकारे अत्याचार झाल्याचे लक्षात आले़. तीने हा प्रकार घरी येउन तातडीने आइला सांगीतला़. आइने मुलीसह पाेलिस स्टेशन गाठले़ ११ जुलै २०१९ राेजी या प्रकरणाची तक्रार बार्शिटाकळी पाेलीस ठाण्यात केली. पाेलिसांनी अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून आराेपी स्वप्नील डाेंगरे याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ व पाेस्काे कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला़ त्यानंतर या प्रकरणाचा तपास बार्शिटाकळी पाेलिस स्टेशनचे पीएसआय रामेश्वर चव्हाण यांनी करून दाेषाराेपपत्र न्यायालयात सादर केले़.

न्यायालयाने या प्रकरणात ८ साक्षीदात तपासल्यानंतर आराेपीविरुध्द आढळलेल्या ठाेस पुराव्यावरुन त्याला पाेस्काे कायद्याच्या विविध कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ यासाेबतच तीन लाख ५० हजार रुपयांचा दंड ठाेठावला़ दंड भरल्यास अतीरीक्त सहा महीन्यांच्या कारावासाची शिक्षेचे प्रावधानान न्यायालयाने केले आहे़ या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने अॅड मंगला पांडे यांनी कामकाज पाहीले़ तर पैरवी अधिकारी म्हणूण एएसआय प्रवीण पाटील यांनी कामकाज पाहीले़.

 

शाळेतील समुपदेशनाने घटना उघड

बार्शिटाकळी तालुक्यतील एका खेडेगावात असलेली मुलगी सात वर्ष वयाची असतांना तीच्यावर स्वप्नील डाेंगरे याने लैंगीक अत्याचार सुरु केले़ मात्र या सर्व प्रकाराबाबत अनभीज्ञ असलेल्या मुलीने कुणाकडेही वाच्यता केली नाही़ एके दिवशी शाळेत लैागीक अत्याचार याच विषयावर समुपदेशन झाले़ त्यामूळे मुलीला तीच्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात येताच तीने कुटुंबीयांना सांगीतले़ त्यांनी पाेलिस ठाण्यात तक्रार केली़ वैद्यकीय तपासणीनंतर प्रकरणाचा उलगडा झाला़ या प्रकरणात शाळेतील समुपदेशन माेलाची भुमीका बजावणारे ठरले़

दुसऱ्या वर्गात असतांनापासून छळ

पिडीत मुलगी सात वर्षांची म्हणजेच दुसऱ्या वर्गात असतांनापासूनच या मुलीचा लैंगीक छळ करण्यात आला़ सात वर्षांची असतांनापासून तर १२ वर्षांची हाेइपर्यंत म्हणजेच या मुलीच्या हा प्रकार लक्षात येइपर्यंत तीचा अशा प्रकारे लैंगीक छळ सुरुच हाेता़ सतत पाच वर्ष लैंगीक छळ करणाऱ्या या आराेपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर तीला न्याय मीळाल्याची प्रतीक्रीया उमटत आहेत़

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी